पुणे
PUNE NEWS : पदभार घेण्यापूर्वीच पदभार काढला; पालिका आरोग्य विभागातील प्रकार

पदभार न देण्यासाठी रेडिओलॉजिस्टचा दबाव?
पुणे, निलेश राऊत PUNE NEWS : महापालिकेच्या आरोग्य विभागातील सहायक आरोग्य अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडील विविध विभाग इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. मात्र पीसीपीएनडीटी (पूर्व गर्भधारणा आणि प्रसवपूर्व निदान अधिनियम) आणि एमटीपी या विभागाचा पदभार दिलेल्या अधिकाऱ्याने पदभार घेण्यापूर्वीच तो दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवला आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडे ते विभाग देऊ नयेत, असा दबाव काही रेडिओलॉजिस्टनी आणल्याने हा बदल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. PUNE NEWS :

महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे हे मे महिनाअखेरला सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडील विविध विभागांचा पदभार हा अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. पीसीपीडीएनडीटी आणि एमटीपीचा पदभार हा डॉ. सूर्यकांत देवकर यांच्याकडून काढून तो डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र त्याला रेडिओलॉजिस्टनी विरोध केल्याने पदभार घेण्याआधीच महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी तो डॉ. राजेश दिघे यांच्याकडे दिला. तसे पत्रही आयुक्तांनी तातडीने काढले.
PUNE NEWS :


