Pune News : येरवड्यातील दुर्घटनेवर महापौरांची असंवेदनशील प्रतिक्रिया
Pune News : ‘मी काय ठेकेदार आहे का? मी त्याला खड्ड्यात ढकलले का?’ अशा आशयाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘माझी ऑडिओ क्लिप एडिट करून दिशाभूल’: नागपुरे यांचा दावा
Pune News : महत्वाचे मुद्दे
*येरवडा येथे ड्रेनेज वाहिनीच्या खड्ड्यात पडून एका ६९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला
*सुरक्षेची पुरेशी यंत्रणा नसलेल्या या खड्ड्यात पडून अपघातावर एका पत्रकाराने महापौरांची कथित प्रतिक्रिया घेतली
*या प्रतिक्रियेची क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली
*आमदार रोहित पवार यांचे ट्विट करत महापौर नागपुरे यांच्या गंभीर आरोप
*पक्षाने घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचा दावा भाजप शहराध्यक्ष घाटे यांनी केलाhttps://maharashtramirror.com/ Pune News
Pune News : पुणे, धनश्री ओतारी
Pune News :पुण्यातील येरवडा परिसरात महापालिकेच्या ड्रेनेज वाहिनीसाठी खोदलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्ड्यात पडून ६९ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर आणि निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच, या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.https://maharashtramirror.com/Pune News
दुर्घटनेनंतर महापौर मंजुषा नागपुरे यांच्या कथित वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. दरम्यान, महापौर नागपुरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ही ऑडिओ क्लिप एडिट करून चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आल्याचा दावा केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
येरवडा येथील चित्रा चौक परिसरातील भाजी मंडईजवळ महापालिकेच्या मलनिस्सारण (ड्रेनेज) विभागाचे काम सुरू होते. त्यासाठी रस्त्यावर मोठा आणि खोल खड्डा खोदण्यात आला होता. स्थानिक नागरिक प्रदीप लक्ष्मण परदेशी (वय ६९, रा. येरवडा) हे रस्त्यावरून जात असताना एका ऑटो-रिक्षाचा सौम्य धक्का लागल्याने त्यांचा तोल गेला आणि ते सुरक्षेची पुरेशी यंत्रणा नसलेल्या या खड्ड्यात कोसळले. उपचारांदरम्यान अंतर्गत रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला.
वादग्रस्त ऑडिओ क्लिप
या घटनेनंतर एका पत्रकाराने फोनवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महापौरांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. या रेकॉर्डिंगमध्ये, “मी काय कंत्राटदार आहे का? मी त्या माणसाला ढकलले का? मी ऑटोरिक्षा चालवत होते का?” असे वादग्रस्त प्रतिप्रश्न महापौरांकडून विचारले गेल्याचे ऐकू येत होते. या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे.
आमदार रोहित पवार यांचे ट्विट
शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत महापौर नागपुरे यांच्या गंभीर आरोप केले. एका दुःखी कुटुंबाप्रती सहानुभूती दाखवण्याऐवजी अशी असंवेदनशील उत्तरे देणे आणि जबाबदारी झटकणे हे शहराच्या प्रथम नागरिकाला अजिबात शोभणारे नाही. यातून प्रशासकीय संवेदनशीलतेचा अभाव स्पष्ट दिसतो, अशी टीका पवार यांनी केली.
दरम्यान, भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “पक्षाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून महापालिका प्रशासनाकडे हा विषय मांडला आहे. शहरातील सर्व सार्वजनिक कामांच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमावलीचे कडक पालन झालेच पाहिजे, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.”
महापालिकेकडून कंत्राटदारावर कारवाईचा बडगा
या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून येरवडा प्रकल्पातील संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निष्काळजीपणा आणि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याबद्दल प्रशासनाने कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची आणि पालिकेची सुरू असलेली तिची इतर सर्व कामे तत्काळ काढून घेण्याची प्रक्रिया आयुक्तांच्या आदेशाने सुरू झाली आहे.


