Mumbai South Lok Sabha Candidate : मुंबई दक्षिण-31 लोकसभा मतदारसंघात 14 अंतिम उमेदवार

Mumbai South Lok Sabha Candidate Name List : निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांची माहिती अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांचे उमेदवारी निश्चित
मुंबई :- मुंबई शहर जिल्ह्यातील ‘31- मुंबई दक्षिण’ Mumbai South Lok Sabha या लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी काल 6 मे उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम 14 उमेदवार आहेत, अशी माहिती मुंबई निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी दिली. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी 3 उमेदवारांनी माघार घेतली. या मतदारसंघात दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. Mumbai South Lok Sabha Live Update
4 मे 2024 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली. ‘31-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी छाननीत 17 उमेदवारांचे अर्ज वैध तर 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. या मतदारसंघासाठी 21 उमेदवारांनी 30 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कटकधोंड यांनी दिली. Mumbai South Lok Sabha Live Update
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह खालीलप्रमाणे
१) अरविंद गणपत सावंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- मशाल
२) मोहम्मद शुऐब बशीर खतिब – बहुजन समाज पार्टी – हत्ती
३) यामिनी यशवंत जाधव- शिवसेना – धनुष्यबाण
४) अफजल शब्बीर अली दाऊदानी – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलिंडर
५) मो. नईम शेख – एम पॉलिटिकल पार्टी – बॅटरी टॉर्च
६) राहुल फणसवाडीकर – लोकशाही एकता पार्टी – शिवण यंत्र
७) सुभाष रमेश चिपळूणकर – राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी – कॅमेरा
८) अरविंद नारायण सावंत – अपक्ष – चिमणी
९) प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष – एयर कंडीशनर
१०) मतीन अहमद नियाज अहमद रंगरेज – अपक्ष – बादली
११) मनिषा शिवराम गोहिल – अपक्ष – शिट्टी
१२) मोहम्मद महताब अख्तर हुस्सेन शेख – अपक्ष – खाट
१३) शंकर सोनवणे – अपक्ष – गॅस शेगडी
१४) सबीहा खान – अपक्ष – हिरा
लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
- निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दीची तारीख – 26 एप्रिल 2024
- मतदानाची तारीख व वेळ – 20 मे 2024, सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
- मतमोजणीची तारीख – 04 जून 2024
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख – 6 जून 2024