महाराष्ट्र

Pune News : दिवाळीत वाहनांच्या विक्रीचा धमाका! इलेक्ट्रिक गाड्यांची तुफान क्रेझ; एकूण वाहन नोंदणीत EV चा टक्का वाढला

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर – सणासुदीच्या काळात, विशेषतः दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन वाहनांची खरेदी केली जाते. कोणत्याही विशेष सणाला आणि शुभमुहूर्ताला वाहन खरेदी करतात. दिवाळीच्या निमित्ताने आरटीओ मध्ये मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
नोंदणी आणि उपलब्ध आकडेवारीवरून ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा ट्रेंड समोर आला आहे. नागरिक आता पारंपरिक इंधनावरील वाहनांकडून वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) वळत आहेत. एकूण वाहन नोंदणीचा विचार करता यंदा काही प्रमाणात घट झालेली दिसत असली, तरी इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) विक्रीने मात्र ६२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढhttps://maharashtramirror.com/ Pune News
नोंदवत नवा विक्रम रचला आहे.📊 दिवाळी कालावधीतील वाहन नोंदणीचा तुलनात्मक तक्तावाहनाचा प्रकार२०२५ दिवाळी (एकूण)२०२५ (EV वाहने)२०२६ दिवाळी (एकूण)२०२६ (EV वाहने)दुचाकी / स्कूटर (M-Cycle/Scooter)१०,२१४१,०८९९,२४५१,८९९चारचाकी / कार (Motor Car)४,२१९३५०३,२३९४२९ऑटोरिक्षा (Auto Rickshaw)५४११४१०९२२मालवाहतूक वाहने (Goods Carrier)७६८३०७२०४२बस (Bus)६४०६६१टुरिस्ट टॅक्सी (Tourist Taxi)६१७६४१२२७ॲम्बुलन्स (Ambulance)९०९०ट्रॅक्टर (Agricultural Tractor)८८१३८०इतर (Other)६२०५१०एकूण (TOTAL)१६,५८२१,४९०१३,८८९२,४२०
एकूण वाहन नोंदणी गेल्या वर्षीच्या १६,५८२ वरून यंदा १३,८८९ इतकी झाली असली, तरी एकूण नोंदणीतील इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा नऊ टक्केवरून वाढून थेट सतरा पाइंट चारवर पोहोचला आहे. हा बदल नागरिक आता इंधनाच्या वाढत्या खर्चावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा विचार करून इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button