Solapur News : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; अक्कलकोटला निघालेल्या भारंबे कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Solapur News :सोलापूर : अक्कलकोटच्या दर्शनासाठी निघालेल्या कल्याण येथील भारंबे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी हद्दीत झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत आठ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश असून, कुटुंबातील आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Solapur News
नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथील भारंबे कुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी कारने जात होते. शुक्रवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची कार मोहोळ तालुक्यातील मौजे तेलंगवाडी परिसरातील डोंगरे वस्ती येथे आली असता, मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.https://maharashtramirror.com/ Solapur News
या अपघातात विलास भारंबे (६६), शोभा भारंबे (६३), पार्थ भारंबे (८) आणि पूनम भारंबे (३८) यांचा मृत्यू झाला. यातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पूनम यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.दरम्यान, तुषार भारंबे (४०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाचा प्रवास अशा प्रकारे संपल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.


