पुणेक्राईम न्यूजपिंपरी चिंचवड

Pune Crime : पुणे पोलिसांची गुन्हेगारांविरुद्ध मोठी कारवाई; आठ जण दोन वर्षांसाठी तडीपार

Pune Crime : चालू वर्षी आतापर्यंत ५३ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई.

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोन यांच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आठ सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५५ व ५६ अंतर्गत दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune Crime

तडीपार करण्यात आलेल्या आठ जणांमध्ये भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संकेत गोरख बोरगे (वय २४) आणि आकाश ऊर्फ बंटी विलास पवार (वय २६) यांचा समावेश आहे. पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैभव युवराज कोळसे (वय २३) आणि सौरभ राजेश साठे (वय २०) यांच्यावरही ही कारवाई करण्यात आली आहे..https://maharashtramirror.com/ Pune Crime

स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निखिल ज्ञानोबा लगाडे (वय २२), विष्णू लक्ष्मण होसमनी (वय २१), अमान शाकीर शेख (वय २०) आणि सचिन ऊर्फ आश्रय सौदागर खुडे (वय २४) यांनाही दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये निखिल लगाडे हा टोळीप्रमुख असून, अन्य तिघे टोळी सदस्य असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या गुन्हेगारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, गंभीर दुखापत, बलात्कार, विनयभंग, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे, अंमली पदार्थांची विक्री, मारहाण, धमकी, बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे यांसारख्या विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या आदेशानुसार संबंधित आठ जणांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

वर्षभरात ५३ गुन्हेगार तडीपार

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत परिमंडळ दोनमधील एकूण ५३ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये आंबेगाव पोलीस ठाणे ११, भारती विद्यापीठ १३, पर्वती ९, बिबवेवाडी ९, स्वारगेट ५, मार्केट यार्ड ४ आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हेगारांचा समावेश आहे.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे आणि अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यापुढेही परिमंडळ दोनमधील सक्रिय गुन्हेगारांविरुद्ध अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधात्मक कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button