पुणेपिंपरी चिंचवड

Pune Crime: इंस्टाग्रामवर शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

Pune Crime: तळेगाव दाभाडे पोलिसांत महिला आरोपीसह दोघांवर गुन्हा

Pune Crime: पिंपरी, महाराष्ट्र मिरर : सोशल मीडियावर शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २५ ते ३० टक्के नफ्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल २२ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत जव्हेरी कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime
रविंद्र नानासाहेब हुंडार (५७, तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डेल्टा टेक इन्व्हेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मॅनेजर महिला आरोपी आणि गुलटेक चंदानी (चंदीगड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे घरी असताना त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर ट्रेडिंगच्या डेल्टाटेक इन्व्हेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची २५ ते ३० टक्के प्रॉफिट असलेली पोस्ट दिसली. फिर्यादीने त्या पोस्टला लाईक केल्यामुळे कंपनीच्या महिला मॅनेजरने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून ॲपमध्ये शेअर ट्रेडिंग केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आरोपींनी पाठवलेल्या लिंकवरून ‘डेल्टा आल्गो’ हे ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करून फिर्यादी यांनी थोडे-थोडे करून २२ लाख ८७ हजार ७८६ रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर त्यांना १ कोटी ७४ हजार रुपयांचा नफा झाला असल्याचे खोटे भासवण्यात आले. त्यानंतर फिर्यादी पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यांना १३ लाख ८१ हजार तीन रुपयांचा टॅक्स भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी स्वतंत्र टॅक्स भरणार असल्याचे सांगितल्यानंतर, टॅक्स न भरल्यास आयकर विभागाकडे मॅनिलॉण्ड्रिंग कायद्यानुसार एफआयआर करून ट्रेडिंग खाते कायमस्वरूपी बंद करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत..https://maharashtramirror.com/ Pune Crime


Pune Crime: भरधाव मोटरसायकलच्या धडकेत महिला गंभीर जखमी

Pune Crime: अपघातानंतर मोटरसायकल चालकाचे पलायन

Pune Crime: पिंपरी, महाराष्ट्र मिरर : रस्त्याने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या मोटरसायकलने जोराची धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास आळंदी रोड, पिंपळगाव येथे घडली..https://maharashtramirror.com/ Pune Crime
या प्रकरणी जखमी महिलेने चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोटरसायकल चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या घराजवळील व्यक्तीचे निधन झाल्यामुळे त्या त्यांच्या घरी जेवण घेऊन आळंदी रोडवर आल्या होत्या. त्यावेळी आळंदीकडून पिंपळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरसायकल स्वाराने फिर्यादी यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या रस्त्यावर खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला व उजव्या पायाच्या गुडघ्याला मार लागला. त्यांना उठता येत नसल्यामुळे नागरिकांनी उपचारासाठी एका खासगी हॉस्पिटल मध्ये नेले. या अपघातात फिर्यादी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून, उजव्या पायाच्या गुडघ्याखाली फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. धडक दिल्यानंतर चालक तिथून पळून गेला. चाकण दक्षिण पोलीस तपास करत आहेत.


Pune Crime: चिखली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी

Pune Crime: अज्ञात वाहनचालक आणि ट्रकचालक यांच्या विरोधात गुन्हा

Pune Crime: पिंपरी, महाराष्ट्र मिरर : दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ट्रकमधील चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास जाधव सरकार चौक, स्पाईन रोड, चिखली येथे घडली..https://maharashtramirror.com/ Pune Crime
या प्रकरणी एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धडक देणारा अज्ञात वाहनचालक आणि ट्रकचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे पती त्यांच्याकडील हिरो कंपनीच्या मोटारसायकलवरून उजव्या बाजूच्या लेनवरून जात असताना, एका अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून पाठीमागून धडक दिली. त्यामुळे ते डाव्या बाजूस खाली पडले आणि मधल्या लेनवरून जाणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.


Pune Crime: भंगार दुकानातून रोख रक्कम व मोबाईल चोरी

Pune Crime: पिंपरी, महाराष्ट्र मिरर : दुकानाची भिंत ओलांडून आत प्रवेश करत चोरट्यांनी टेबलमधील ड्रॉर उघडून रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेला. ही घटना गुरुवारी (५ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजताच्या सुमारास राही पेट्रोलपंपा समोर, सोळू येथे घडली. दयानत तुल्ला खान (३९, सोळू, खेड, मूल रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदर्श अंकुश ईटकर, ओम भालेकर, सिध्दार्थ मनोहर (सर्व रा. वाघोली) आणि त्यांचे इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांच्या दुकानाच्या पाठीमागील भिंतीवरून विनापरवानगी आणि चोरीच्या इराद्याने आरोपींनी दुकानात प्रवेश केला. त्यांनी दुकानातील लाकडी टेबलच्या ड्रॉरची चावी शोधून ड्रॉर उघडला आणि त्यामध्ये ठेवलेले ९० हजार रुपये तसेच टेबलवर ठेवलेला आकाशी रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला. या प्रकरणी आळंदी पोलीस तपास करत आहेत.

Pune Crime: भोसरीत हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी

Pune Crime: अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime: पिंपरी, महाराष्ट्र मिरर : हॉस्पिटलच्या खाली पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली. ही घटना १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान मंकीकर हॉस्पिटलच्या खाली, भोसरी येथे घडली.
अनिल राजेंद्र पाटील (२८, भोसरी, मूल रा. धुळे) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांची २५ हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची यामाहा कंपनीची एफझेड दुचाकी त्यांनी मंकीकर हॉस्पिटलच्या खाली पार्किंगमध्ये व्यवस्थित लॉक करून पार्क केली होती. ही दुचाकी कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.
भोसरी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button