Pune News : मानधनावरील शालेय कर्मचार्यांसह आशा सेविकांना दिवाळी बक्षीस
Pune News : स्थायी समितीची प्रस्तावांना मान्यता; आशा सेविकांना प्रत्येकी १० हजार रुपये
Pune News :पुणे: पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये एकवट मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच आरोग्य विभागातील आशा सेविकांना चालू आर्थिक वर्षासाठी दिवाळी बक्षीस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. या प्रस्तावांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.https://maharashtramirror.com/ Pune News
महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विविध पदांवर एकवट मानधनावर काम करणारे कर्मचारी शैक्षणिक उपक्रम, प्रशासकीय कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी मोठे योगदान देतात. मात्र, नियमित कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळत नव्हते. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी त्यांना दिवाळी बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
आशा सेविकांच्या कामाची दखल महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आशा सेविकांना प्रत्येकी १० हजार रुपये दिवाळी बक्षीस मंजूर करण्यात आले आहे. माता व बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब कल्याण, विविध आजारांचे सर्वेक्षण आणि आरोग्यविषयक जनजागृतीमध्ये आशा सेविका मोलाची भूमिका बजावतात.अत्यंत अल्प मानधनावर काम करणाऱ्या या महिलांना ऐन सणासुदीच्या काळात दिलासा मिळावा, या उद्देशाने ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.
“महापालिकेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागातील मानधनावरील कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊनच दिवाळीनिमित्त हे आर्थिक बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” — श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती (पुणे महापालिका)


