पुणेकोल्हापूरपिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

Kohlapur News : गोकुळ दूध संघातील स्वीकृत संचालक नियुक्तीवरून महायुतीत मतभेद; शिवसेना शिंदे गटाची नाराजी

Kohlapur News : भाजप आणि अजित पवार गटाच्या भूमिकेला शिंदे गटाचा विरोध; निवडून आलेल्या संचालकांचा कौल मान्य करण्याची शिवसेनेची भूमिका

Kohlapur News :कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मध्ये चार शासननियुक्त स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीच्या निर्णयावरून महायुतीमध्येच मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भूमिकेला शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांनी विरोध दर्शविला असून, या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.https://maharashtramirror.com/ Kohlapur News

गोकुळ दूध संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने बाजी मारली. संघाच्या २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवत या आघाडीने काठावरचे बहुमत प्राप्त केले, तर महायुतीच्या वाट्याला १२ जागा आल्या. मात्र, राज्य सरकारने विशेष अध्यादेशाद्वारे संचालक मंडळाची संख्या पाचने वाढविण्याचा निर्णय घेतल्याने गोकुळमधील सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे..https://maharashtramirror.com/ Kohlapur News

नव्या निर्णयानुसार शासननियुक्त स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने गोकुळमधील सत्तेच्या गणिताला नवे वळण मिळाले आहे. या नियुक्त्यांमुळे महायुतीचे संख्याबळ १६ वर पोहोचण्याची शक्यता असून, त्यामुळे सध्या समविचारी आघाडीकडे असलेले बहुमत धोक्यात येऊ शकते. परिणामी, गोकुळमध्ये सत्तांतराची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयावरून महायुतीमधील घटक पक्षांमध्येच एकमत नसल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेना शिंदे गटाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या संचालकांचा जनादेश मान्य केला पाहिजे. कोल्हापूरची जनता आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी निवडणुकीत दिलेल्या कौलाचा सर्वांनी सन्मान करणे आवश्यक आहे, अशी भूमिका शिवसेनेच्या शिंदे गटाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्य सरकारच्या निर्णयामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे गोकुळमधील सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता असताना दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्षांची वेगवेगळी भूमिका समोर येत आहे. त्यामुळे स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीचा निर्णय आणि त्यावरून निर्माण झालेला वाद आगामी काळात कोणते वळण घेतो, याकडे कोल्हापूरच्या राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button