SomeshwarNager News : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड!
SomeshwarNager News :सोमेश्वरनगर : राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना म्हणून ओळख असलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता नव्या नेतृत्वाची निवड झाली आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्याच्या नेतृत्वाची धुरा आता या दोघांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ SomeshwarNager News
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची नुकतीच अत्यंत चुरशीच्या वातावरणात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत राजकीय संघर्षाचे चित्र पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनेलच्या विरोधात अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी करत स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.https://maharashtramirror.com/ SomeshwarNager News
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांमधील राजकीय समीकरणे, पुरुषोत्तम जगताप यांची बंडखोरी आणि भाजपकडूनही या निवडणुकीत प्रभाव निर्माण करण्याचे प्रयत्न, अशा विविध घडामोडींमुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. मात्र, प्रत्यक्ष निकालात सभासदांनी सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. त्यामुळे कारखान्यावरील सत्ता पुन्हा पवार कुटुंबाच्या नेतृत्वाखालील पॅनेलकडे आली.
अजित पवार हयात असताना श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर त्यांचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत राजकीय समीकरणे बदललेली पाहायला मिळाली. त्यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
या पार्श्वभूमीवर आता अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे आणि उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड झाल्याने कारखान्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. आगामी काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित, ऊसदर, कारखान्याची आर्थिक स्थिती आणि सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान नव्या नेतृत्वासमोर असणार आहे.



