Pune News : राज्यातील सर्वात मोठे, अत्याधुनिक एसटी ‘बस पोर्ट’ शिवाजीनगरमध्ये
Pune News : ८२५ कोटींच्या प्रकल्पासाठी महामेट्रो आणि एसटी महामंडळामध्ये सामंजस्य करार
Pune News :महत्वाचे मुद्दे
*शिवाजीनगर येथील एसटी महामंडळाच्या १५,४०० चौरस मीटर जागेवर हा विकास प्रकल्प प्रस्तावित
*सुमारे ४९०० चौरस मीटर जागेवर महामेट्रोने शिवाजीनगर मेट्रो स्थानक
*उर्वरित १०,५०० चौरस मीटर जागेवर बस पोर्ट आणि व्यावसायिक विकासाची योजना
*हे एसटी स्थानक शिवाजीनगर रेल्वेस्थानक, मेट्रो स्थानक, पीएमपीएमएल बससेवा आणि रिक्षा थांबे यांना थेट जोडणारे मध्यवर्ती केंद्र असेलhttps://maharashtramirror.com/ Pune News
धनश्री ओतारी
Pune News : पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या एसटी बसस्थानकाच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या ठिकाणी राज्यातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक एसटी ‘बस पोर्ट’ उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, सुमारे ८२५ कोटी रुपयांच्या या प्रस्तावित प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार स्वाक्षरीत करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News
मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण करार पार पडला. या प्रसंगी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.
शिवाजीनगर येथील एसटी महामंडळाच्या १५,४०० चौरस मीटर जागेवर हा विकास प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यापैकी सुमारे ४९०० चौरस मीटर जागेवर महामेट्रोने शिवाजीनगर मेट्रो स्थानक उभारले आहे. उर्वरित १०,५०० चौरस मीटर जागेवर बस पोर्ट आणि व्यावसायिक विकासाची योजना आखण्यात आली आहे.
वाकडेवाडीतील बसस्थानक पुन्हा मूळ जागेवर येणार
शिवाजीनगर येथील मूळ एसटी बसस्थानकाचे २०१९ मध्ये महामेट्रोच्या भुयारी स्थानकाच्या कामासाठी वाकडेवाडी येथील आरे डेअरीच्या जागेवर तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर बसस्थानक मूळ ठिकाणी सुरू होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना होती. नव्या कराराने या प्रक्रियेला वेग दिला असून, अत्याधुनिक बहुमजली इमारत उभी राहिल्यानंतर वाकडेवाडीतील बससेवा पुन्हा शिवाजीनगर येथे पूर्ववत हलवण्यात येईल.
प्रस्तावित बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावर प्रवाशांसाठी एसटी बसस्थानक, पहिल्या मजल्यावर बस पार्किंग आणि त्यावरील मजल्यांचा व्यावसायिक वापर केला जाईल. बसगाड्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कार्यशाळा, आधुनिक प्रतीक्षागृह आणि चार्जिंग सोयी उपलब्ध असतील. हे स्थानक केवळ एसटीपुरते मर्यादित न राहता शिवाजीनगर रेल्वेस्थानक, मेट्रो स्थानक, पीएमपीएमएल बससेवा आणि रिक्षा थांबे यांना थेट जोडणारे मध्यवर्ती केंद्र ठरेल. मुंबई, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाकडे प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांचा वेळ यामुळे वाचणार आहे.
गेल्या पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून महामेट्रो आणि एसटी महामंडळातील करारामुळे शिवाजीनगरच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली आहे.



