Nilesh Rane to join Shiv Sena : भाजपाला जय महाराष्ट्र करत, निलेश राणे शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती घेणार
रत्नागिरी :- राणे आणि शिवसेना यांच्यातला वाद जगजाहीर आहे शिवसेनेचे फारकत घेतल्यानंतर तब्बल वीस वर्षांनी राणे कुटुंबातील सदस्य पुन्हा शिवसेनेत सामील होणार होणार आहे. भाजपाचे खासदार ज्येष्ठ नेते नारायण राणे Naryan Rane यांचे सुपुत्र निलेश राणे Nilesh Rane यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात उद्या प्रवेश करणार आहे. शिवसेना शिंदे गटात आपण उद्या जाहीरपणे प्रवेश करणार असल्याची माहिती खुद्द निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
निलेश राणे म्हणाले की, नारायण राणे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवातच ज्या पक्षातून केली आहे त्या पक्षात मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळत आहे याबद्दल मी आनंदीत आहे. किंवा कुडाळ मधून निवडणूक जिंकण्यासाठी आपण काम करणार आहोत. कुडाळमधून धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार असल्याचे निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. 2004 साली नारायण राणे धनुष्यबाणावर निवडणूक लढवली होती.
भाजपमध्ये मला शिस्त शिकायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी मला कायम लहान भावासारखी वागणूक दिली. भाजपमध्ये सर्वच नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत, ते कायम राहतील. आज जास्त काही बोलण्यासारखे नाही. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्याची जी संधी मिळाली त्याचा आनंद आहे. पक्षांने काही हवा काढली नाही. मी शिस्त आणि प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे.
निलेश राणेंचा राजकीय प्रवास
नीलेश राणे हे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून खासदार झाले होते. 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नीलेश राणे हे कुडाळ-मालवणमधून लढण्यास इच्छुक आहेत.