आर्थिकक्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crypto News : स्टॉक मार्केटची माहिती देण्याचा बनाव रचून क्रिप्टो करन्सी जबरदस्ती ट्रान्सफर करणाऱ्या टोळीला बेड्या

  • वपोनि महेश बोळकोटगी यांची धडाकेबाज कामगिरी

पुणे, दि. १५ ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर : Pune Crypto News

थर्ड वेव्ह कॅफे समोर, हाय स्ट्रीट, बालेवाडी चार अनोळखी साथीदार यांनी आपसात संगणमतकरून एकास स्टॉक मार्केटच्या कोर्सची माहिती घेण्याच्या बहाण्याने बोलावुन त्यांच्याकडील इनोव्हा गाडीमधून जबरदस्तीने बसवुन घेवून जावुन त्यांना चाकूचा धाक दाखवून व त्यांचे तोंड दाबून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून त्यांचेकडील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन घेवून व त्यांचा पासवर्ड प्राप्त करुन घेवुन त्यांचे मोबाईल मधील बायनांन्स एक्सचेंज अॅप्लीकेशन मधून एकुण १६,०२,५१०/- रूपये किंमतीची १७,६१०.०४२२८५ युएसडीटी क्रिप्टो करन्सी ही त्याच्या बायनांन्स एक्सचेंज अॅप्लीकेशनवर जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतली होती.

दाखल गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना यातील आरोपीचा गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील आरोपी हे जिल्हा- जळगाव या ठिकाणी असल्याचे माहिती प्राप्त झाल्याने तपास अधिकारी व अंमलदार यांना रवाना केले असता त्यांनी यातील आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे १) मयूर कैलाश अमोदकर, वय-२५ वर्ष, रा-रामेश्वर कॉलनी, प्लॉट नं.१०, गट नं. २५१ मेहरुण जळगाव. २) मनिष राजेंद्र भोंडे, वय-२४ वर्ष, रा-मोहाडी रोड, कृपाल आश्रम जवळ जळगाव. यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा हा त्यांचे साथीदार नामे ३) भुषण गोकुळ कोळी, वय-२७ वर्ष, रा-घर नं.८५ समतानगर, साईबाबा मंदिराजवळ, जळगाव. ४) जितेंद्र प्रदीप वाघ, वय ३३ वर्ष, रा-शिक्षक कॉलनी, कोल्हे हिल्स परीसर, विवेकानंद शाळेजवळ जळगाव. ५) चंद्रकांत रमेश देशमुख, वय ३४ वर्ष, रा-प्लॉट ३१ए, महाबळ कॉलनी जळगाव. यांचेसह केल्याचे तपासात कबुली दिल्याने नमुद आरोपीचा तपास पथक मधील अधिकारी व अंमलदार यांनी जळगाव या ठिकाणी जावुन शोध घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन गुन्हा करताना वापरलेली इनोव्हा गाडी, चाकु, व इतर असा एकुण- १०,५६,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल, हस्तगत करण्यात आला आहे. तसेच यातील आरोपी यांनी फिर्यादी यांची जबरदस्तीने ट्रांन्फर केलेली किप्ट्रो करंन्सी मधील एकुण-७,९४,०००/ ०/- रुपये किंमतीची करंन्सी शिस करण्यात आली असुन उत्तम कामगिरी केली आहे. तसेच यातील अटक आरोपी हे सध्या मॅजीस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये आहेत.

तसेच सदरची कामगिरी ही Pune police पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त हिंम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी, प्रणिल चौगले, पोलीस हवालदार/श्रीकांत वाघवले, पोलीस हवालदार/श्रीधर शिर्के, पोलीस हवालदार/इरफान मोमीन, पोलीस हवालदार/बाबुलाल तांदळे, पोलीस हवालदार/ सुधाकर माने, पोलीस हवालदार/बाबासाहेब दांगडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0