Pune Crime News | हनी ट्रॅप, खंडणी प्रकरणात पोलीस उपनि काशिनाथ उभे यांचा सहभाग : पुणे पोलीस दलात चाललंय काय?
- विश्रामबाग पोलिसांकडून सखोल चौकशी
पुणे, दि. ३ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News
प्रेम प्रकरणातून हनी ट्रॅप Honey trap करत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी वसूल करणाऱ्या तीन महिलांसोबत त्यांचा साथीदार म्हणून पोलीस उपनि काशिनाथ उभे (PSI Kashinath Ubhe) यांना आरोपी करण्यात आले आहे. पोलीस उपनि काशिनाथ उभे यांचे नाव आरोपी म्हणून समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
काल दि. २ रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्यादी यांच्या तक्रारीवरून १. अवंतिका सोनवणे २. आरती गायकवाड ३. पूनम पाटील व इतर यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात अधिक तपास करताना पोलीस अधिकारी उपनि काशिनाथ उभे यांचा सहभाग निश्चित करण्यात आला.
पोलीस उपनि काशिनाथ उभे सध्या पोलीस मुख्यालय येथे नियुक्तीस आहेत. त्यांना पुण्यातील ‘चर्चित’ पोलीस म्हणून ओळखले जाते. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच ते पसार झाले असल्याची माहिती येत आहे.
सदर गुन्ह्याचा तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनि मनोज बरुरे (PSI Manoj Barure) करत आहेत.
पुणे पोलीस दलात चाललंय काय?
Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याची सूत्रे स्वीकारल्यापासून पुण्यातील भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. अमितेश कुमार यांनी ‘मिशन ६५’ राबवत वसुली बहाद्दर यांना सक्त ताकीद देत हक्काच्या ठिकाण्यावरून इतरत्र हलविले. त्यामुळे अवैध धंद्याबाबत पुणे पोलिसांची भूमिका नेमकी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.