पुणे

Pune News : अमली पदार्थ तस्कराचा पाठलाग करताना हवालदाराचे निधन

Pune News :जावेब बागसिराज आरोपीचा पाठलाग करत असताना अचानक कोसळले

Pune News :पिंपरी: शहराला विळखा घातलेल्या एमडी ड्रग्सच्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावणारे एक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी दुर्देवाने काळाच्या पडद्याआड गेले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकातील हवालदार जावेब बागसिराज (वय ३८) यांचे रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) रात्री कर्तव्य बजावत असताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दल आणि परिसरात शोककळा पसरली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

घटना नेमकी कशी घडली?
पिंपरी येथील संत तुकाराम नगर परिसरातील एका अंतर्गत सोसायटीजवळ एमडी ड्रग्सची विक्री करण्यासाठी काही संशयित आरोपी येणार असल्याची खात्रीशीर माहिती हवालदार जावेब बागसिराज यांना मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्यांसह त्यांनी त्या भागात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे संशयित आरोपी येताच पोलिसांनी एकाला रंगेहात पकडले. मात्र, त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ लागला. आरोपी हातातून निसटू नये म्हणून जावेब यांनी त्याच्या मागे धाव घेतली. चोराचा पाठलाग करत धावत असतानाच अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळा आली, पायातले त्राण संपले आणि ते जमिनीवर कोसळले. सहकार्यांनी तात्काळ त्यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान आलेल्या दुसऱ्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक प्रवास
मूळचे कर्नाटकचे असलेले जावेब यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले होते. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या जावेब यांनी २०१० मध्ये पुणे पोलीस दलात प्रवेश केला. हडपसर, मुंढवा आणि त्यानंतर २०१० मध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालय सुरू झाल्यानंतर त्यांनी पिंपरी पोलीस ठाणे व गुन्हे शाखेत धडाकेबाज कामगिरी बजावली होती. ते अत्यंत शांत, संयमी आणि आपल्या कामावर निस्सीम प्रेम करणारे कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून ओळखले जात होते.

मुलांच्या डोक्यावरून हरपले मायेचे छत्र
या दुर्दैवी घटनेमुळे जावेब यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या मागे १२ वर्षांची मुलगी आणि अवघ्या ७ वर्षांचा मुलगा असा परिवार असून, वडिलांच्या छत्रापासून हे चिमुकले पोरके झाले आहेत. कसबा येथील कब्रस्तानात सोमवारी दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या या वीरपुत्राला उपस्थित सहकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी अश्रूू पूर्ण नयनांनी अखरा निरोप दिला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button