पुणेपिंपरी चिंचवड

Pune Crime : एका इसमाचे मोटरसायकलसह अपहरण करणाऱ्या टोळीस २४ तासांत अटक

Pune Crime :ऊसतोडीच्या उचल रक्कमेच्या वादातून; उत्तर महाळुंगे पोलिसांची कामगिरी

Pune Crime :पिंपरी चिंचवड: ऊसतोडीच्या उचल पैशांच्या वादातून एका इसमाचे मोटरसायकलसह अपहरण करणाऱ्या टोळीचा उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण ८ आरोपींना अटक केली असून, अपहृत इसमाची सुखरूप सुटका केली आहे.https://maharashtramirror.com/ pune Crime

काय आहे नेमकी घटना?
दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घाटे वस्ती, आंबेठाण येथून तीन रिक्षांमधून आलेल्या काही जणांनी राजेश चव्हाण यांचे त्यांच्या मोटरसायकलसह अपहरण केले होते. याप्रकरणी फिर्यादी सुषमा राजेश चव्हाण (वय ३० वर्षे) यांच्या तक्रारीवरून उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.https://maharashtramirror.com/ Pune Crime

तपास आणि कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रथम अमोल रामराव राठोड (वय २९), सचिन रामराव राठोड (वय २५) आणि निलेश संतोष राठोड (वय २७, तिघेही रा. चाकण; मूळ रा. दिंडाळा, यवतमाळ) यांना शिक्रापूर येथून ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, संदीप गुलाब राठोड (रा. यवतमाळ) याच्या ऊस तोडीचे उचल दिलेले पैसे राजेश चव्हाण घेऊन आल्यामुळे हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. एकूण आठ जणांनी मिळून हे अपहरण केले होते.

त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत दिंडाळा (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथून उर्वरित आरोपींना ताब्यात घेऊन अपहृत राजेश चव्हाण यांची २४ तासांच्या आत सुखरूप सुटका केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
अमोल रामराव राठोड (वय २९), सचिन रामराव राठोड (वय २५), निलेश संतोष राठोड (वय २७), शुभम प्रल्हाद जाधव (वय २५), संदीप गुलाब राठोड (वय ४२), इंदल थावरा जाधव (वय ४०, सर्व रा. दिंडाळा, जि. यवतमाळ), राजू बापूराव चव्हाण (वय ४४, रा. ता. उमरखेड, जि. यवतमाळ), संदीप उदयभान जाधव (वय ३२, रा. ता. हदगाव, जि. संभाजीनगर).
मुद्देमाल जप्त
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ह्युंदाई व्हेन्यू कार, तीन ऑटो रिक्षा आणि अपहृत इसमाची शाईन मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

ही धडक कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त श्वेता खेडकर व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी यदु आढारी, विठ्ठल वडेकर, अनिल गोरड, भैरोबा यादव, संतोष काळे, बापूराव सोनपसारे, गणेश गायकवाड, मंगेश कदम, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, मंगेश घोलप, साहिल सांडभोर आणि समीर महात यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button