Pune News: अंजू शेंडे पुण्याच्या नवीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश
अंजू शेंडे पुण्याच्या नवीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश
Pune News: जिल्हा न्यायाधीश म्हणून २०१० मध्ये न्यायसेवेत प्रवेश
पुणे: पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश म्हणून अंजू एस. शेंडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. त्यांनी २०१० मध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून न्यायसेवेत प्रवेश केला. त्यांनी अमरावती येथे केंद्रीय अन्वेषण विभागाचे न्यायालय, मुंबई येथे महिलांवरील अत्याचार निवारण न्यायालय, पोक्सो न्यायालय आणि ‘सेबी’च्या विशेष न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News मुंबई येथील लघुवाद न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायाधीश, नागपूर येथील औद्योगिक न्यायालयात सदस्य आणि वर्धा येथे विशेष पोक्सो न्यायाधीश म्हणून काम केले. त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निबंधक होत्या; तसेच त्यांनी बीड, भंडारा, धाराशिव आणि अहिल्यानगर येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले आहे. न्यायसेवेपूर्वी त्यांनी ‘सर्च’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटनेसमवेत आदिवासी महिलांच्या आरोग्यावर काम केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News


