Pune News :तीन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई; कार्तिकी पाटीलची ‘एसजीएफआय’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Pune News :पुणे : तेलंगणा राज्यातील नचाराम येथे आयोजित ‘सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा २०२६’ मध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल (उंड्री) येथील युवा नेमबाजांनी अप्रतिम कामगिरी करत तीन सुवर्ण आणि एका कांस्यपदकावर आपले नाव कोरले. या दिमाखदार यशासह कार्तिकी पाटील हिची आगामी ‘एसजीएफआय’ शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या राष्ट्रीय स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. वैयक्तिक प्रकारात कार्तिकी पाटील हिने उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले, तर ईवा मोदी हिने राष्ट्रीय स्तरावर सहावा क्रमांक मिळवत छाप पाडली. सांघिक प्रकारात कार्तिकी पाटील, ईवा मोदी आणि ऋत्वी घनावत या तिघांच्या संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. खेळाडूंची मेहनत, सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि प्रशिक्षक उज्ज्वला मॅडम यांचे उत्तम मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News
या उल्लेखनीय यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, संचालक यशोवर्धन मालपाणी आणि अनिष्का मालपाणी तसेच शाळेच्या प्राचार्या शारदा राव यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. या यशामुळे ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. खेळाडूंची मेहनत आणि मार्गदर्शकांचे सहकार्य यातूनच हे यश साकार झाले आहे. – शारदा राव, प्राचार्या


