पुणे

Pune FDA : लेबल नसलेले तूप व नमकीन जप्त

Pune FDA: विना लेबल तूप आणि भेसळीच्या संशयित नमकीनचा सुमारे १.२२ लाखांचा साठा जप्त

Pune FDA
पुणे, महाराष्ट्र मिरर :

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ( Pune FDA ) ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानांतर्गत पुण्यात मोठी कारवाई करत १ लाख २२ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे लेबल नसलेले तूप आणि नमकीन जप्त केले. या कारवाईत एकूण ३९० किलो खाद्यपदार्थ ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये भेसळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ( pune FDA pimple unlabeled ghee namkeen seizure)

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पुणे विभागाने ( Pune FDA ) पिंपळे गुरव येथील भालेकर नगर परिसरातील गे. देवाश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या आस्थापनाची विशेष तपासणी केली. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना कोणतेही लेबल नसलेले तसेच भेसळयुक्त असल्याचा संशय असलेले सुमारे २३० किलो तूप आढळून आले. ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानांतर्गत पुण्यात मोठी कारवाई करत १ लाख २२ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे लेबल नसलेले तूप आणि नमकीन जप्त केले. या कारवाईत एकूण ३९० किलो खाद्यपदार्थ ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये भेसळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ( pune FDA pimple unlabeled ghee namkeen seizure)

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालीया तुपाची अंदाजे किंमत १ लाख १० हजार ५०० रुपये असून, त्यासह नमकीनसह एकूण १.२२ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यानिमित्त जादा बसेसचे नियोजन

तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DaXewCVtpXA

जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले. ( Pune FDA )

Eknath Shinde hospitalized : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल

ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) विश्वजित शिंदे यांच्या देखरेखीखाली अन्न सुरक्षा अधिकारी एस. जी. घाटोल यांनी एस. एस. पटवर्धन आणि अक्षय शेळके यांच्या पथकासह केली.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button