महाराष्ट्र

Pune crime : आईच्या खूनप्रकरणी मुलाची निर्दोष मुक्तता

Pune crime : वाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Pune crime : पुणे: महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : वाई येथील सोनाबाई भणगे यांच्या २०१९ साली झालेल्या खूनप्रकरणी त्यांच्या मुलाची वाई येथील जिल्हा न्यायाधीश १ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.डी.कदम यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. विठ्ठल धोंडीबा भणगे असे निर्दोष सुटलेल्याचे नाव आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

वाई तालुक्यातील अकोशी येथील रामचंद्र धोंडीबा भणगे यांच्या मालकीच्या असणाऱ्या दत्त मंदिरातील दत्ताच्या मुर्तीची मोडतोड करून सोनाबाई धोंडीबा भणगे यांचे भिंतीवर डोके आपटून खून करण्यात आला होता. याप्रकरणी २० जानेवारी २०२९ रोजी वाई पोलिस ठाण्यात विठ्ठल धोंडीबा भणगे याच्याविरोधात अकोशी येथील पोलीस पाटील कृष्णदेव भणगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाई पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.https://maharashtramirror.com/ Pune crime

याप्रकरणी वाई पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन येडगे यांनी तपास करीत वाई येथील जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी अँड.दिनेश धुमाळ यांनी विठ्ठल भणगे यांच्यावतीने युक्तीवाद केला. या खटल्याची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश १ बी.डी कदम यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी अँड.दिनेश धुमाळ यांनी मांडलेले साक्षी, पुरावे व मुद्दे ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.डी.कदम यांनी विठ्ठल भणगे यांची सबळ पुराव्याअभावी या खटल्यातून निर्दोष मुक्तता केल्याची माहिती अँड.धुमाळ यांनी दिली सदर खटल्यामध्ये अँड.विद्या धुमाळ, अँड.भारती कोरवार यांनी सहकार्य केले आहे..https://maharashtramirror.com/ Pune crime

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button