पिंपरी चिंचवडक्राईम न्यूज

Crime News : ‘चाकण भागात व्यवसाय करायचा असेल तर पैसे दे नाहीतर तुला खल्लास करतो’

Crime News

Crime News: सिक्युरिटी व्यावसायिकाकडून तीन लाखांची खंडणी; एकास अटक

Crime News

पिंपरी: चाकण भागात माझी मोठी दहशत आहे. ‘इथे सिक्युरिटीचा व्यवसाय चालवायचा असेल तर पैसे द्यावेच लागतील, नाहीतर तुला खल्लास करून टाकेन’, अशी धमकी देऊन तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Crime News )

मसना ऊर्फ महेश सखाराम शिरोळे (२८, रा. चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीकांत शामराव बाबर (४४, रा. नवी सांगवी) यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. (Crime News ) तक्रारदार बाबर आणि त्यांच्या कंपनीचे सुपरवायझर संदीप कणसे यांना आरोपी महेश शिरोळे हा २५ जून ते २९ जून दरम्यान मोबाइलवरून सतत धमक्या देत होता.

सुरुवातीला त्याने १० लाख, नंतर क्रमशः ८ लाख, ७ लाख आणि शेवटी ६ लाख रुपयांची खंडणी मागितली. धमकीला घाबरून बाबर यांनी पोलिसांशी संपर्क साधला. ३० जून रोजी ३ लाख रुपये देण्याचे ठरले होते.

पोलिसांचा फिल्मी प्लॅन
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक अनोखा फिल्मी प्लॅन आखला. पोलिसांनी ५०० रुपयांच्या १२ खऱ्या नोटा आणि चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया लिहिलेल्या हुबेहूब दिसणाऱ्या ५८८ डमी नोटा वापरल्या. १०० नोटांच्या ६ बंडलांमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा लावून हुबेहूब ३ लाख रुपयांचे बंडल तयार केले आणि ते प्लास्टिक पिशवीत ठेवून सुपरवायझरकडे दिले.

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla : पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

ठरल्याप्रमाणे दिघी येथील आळंदी-पुणे रोडवरील मॅक्झिन चौकातील स्वच्छतागृहाजवळ आरोपी पैसे घेण्यासाठी आला. सुपरवायझरकडून तीन लाख रुपयांची ती पिशवी स्वीकारत असतानाच, दबा धरून बसलेल्या खंडणी विरोधी पथकाने झडप घालून मसनाला रंगेहाथ ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.(Crime News )

ही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी उपनिरीक्षक अमर राऊत, कॉन्स्टेबल सुनील कानगुडे, प्रदीप पोटे, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, गणेश गिरीगोसावी, चंद्रकांत जाधव, किरण जाधव, संदीप गंगावणे, निलेश जाधव यांनी केली.

Pune Rain Update: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

Pune Rain Update: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! जहांगीर चौक ते मंगलदास चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button