क्राईम न्यूजपुणे

CRIME NEWS : लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; तीन सराईत गुन्हेगार अटकेत

देशी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि कारसह ६.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान संशयास्पद कार अडवून तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली. आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि एक कार असा एकूण ६ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक नाकाबंदी सुरू असताना वाघोलीकडून नगरच्या दिशेने जाणारी काळ्या फिल्म लावलेली पांढऱ्या रंगाची ग्लांझा कार संशयास्पदरीत्या आढळली. पोलिसांनी कार थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वेगाने निसटून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नाकाबंदीवरील पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून कार अडवली.CRIME NEWS

कारची झडती घेतली असता त्यामध्ये रोहन ऋषिकेश गायकवाड (वय २२, रा. लोणीकंद), अभिषेक भानुदास लंघे (वय २५, रा. करडे, ता. शिरूर) आणि विशाल उद्धव झोडगे (वय २२, रा. कासारी, ता. शिरूर) हे तिघे आढळले.CRIME NEWS

तपासणीदरम्यान कारमधून ३० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल, ६ हजार रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे आणि सुमारे ६ लाख रुपये किमतीची टोयोटा ग्लांझा कार असा एकूण ६.३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.CRIME NEWS

या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-७) डॉ. प्रशांत अमृतेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.CRIME NEWS

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कागणे तसेच त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

CRIME NEWS

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button