पुणे

sunetra pawar : सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप

sunetra pawar : सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षात धुसफूस; प्रक्रियेवर काही सदस्यांचा आक्षेप

Suntra Pawar : सुनेत्रा अजित पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या संभाव्य निवडीच्या पार्श्वभूमीवर पक्षातच मतभेद उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षातील काही सदस्यांनी या निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याचा दावा केला असून, संघटनात्मक नियमांचे पालन झाले का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ( sunetra pawar ncp presidency objection )

Pune Metro : हिंजवडी मेट्रोचा १५ जुलैचाही मुहूर्त हुकणार

आक्षेप घेणाऱ्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय अध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या पदासाठी नियुक्ती किंवा निवड करताना पक्षाच्या संविधानानुसार प्रक्रिया राबविणे, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेणे आणि सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. मात्र, या प्रक्रियेबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ( sunetra pawar )

काही सदस्यांनी पक्ष नेतृत्वाकडे लेखी निवेदन देत नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सर्व पदाधिकाऱ्यांना समान संधी व सहभाग मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दुसरीकडे, सुनेत्रा अजित पवार यांच्या समर्थकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांचा प्रभावी सामना करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असून, त्यानुसारच निर्णय घेतला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ( sunetra pawar )

MahaRERA: ताबा देण्यास विलंब केल्याप्रकरणी बिल्डरला व्याजाचा फटका

या घडामोडींवर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या आक्षेपांवर पक्ष काय भूमिका घेतो आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय काय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नोटीस मध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक ही अवैध असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे, त्यामुळे ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव म्हणून ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत स्वतंत्र आणि निपक्षपाती असा निवडणूक अधिकारी नेमून त्यांच्या मार्फत निवडणूक घेण्यात यावी. तोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारीत ॲाफिस बेअररची यादी ही रद्द समजावी, असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button