Accident: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात युवा नेत्याचा जागीच मृत्यू

Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात भरधाव फॉर्च्युनरची टेम्पोला धडक; शुक्रवारी पहाटे घडली दुर्घटना
पुणे, महाराष्ट्र मिरर
Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ बोगद्यामध्ये शुक्रवारी पहाटे झालेल्या अत्यंत भीषण अपघातात वाकडमधील तरुण राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. शुक्रवारी पहाटे १:२० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. Accident Missing Link Tunnel Politician Killed
Water News : खडकवासला धरण साखळीमधील चारही धरणे भरली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टोयोटा फॉर्च्युनर कारमधून काही जण पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. बोगद्यामध्ये प्रवास करत असताना अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने पुढे चालणाऱ्या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेमुळे दोन्ही वाहने उलटली.
: म्हणे खड्डे दाखवा बुजवायला सांगतो….

या अपघातात फॉर्च्युनरमधील ३० ते ३५ वयोगटातील तरुण नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील इतर चार जणांना किरकोळ दुखापती झाल्या असून, टेम्पोमधील प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) रुग्णवाहिकेद्वारे सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.Accident
अपघातानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत होऊ दिली गेली नाही आणि वाहनांची ये-जा सुरळीत ठेवण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. Accident

तुषार भूमकर यांच्या निधनामुळे वाकड आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी शोककळा पसरली असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त होत आहे. मृत भूमकर यांच्या पत्नीने यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक लढवली होती. या अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)


