महाराष्ट्रपुणे

NEET : पुण्यात ‘महाराष्ट्र बंद’ला अभूतपूर्व प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उसळला जनसागर!

NEET : शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज आणि पोलिसी दडपशाहीचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही उमटले

पुणे, महाराष्ट्र मिरर

NEET : दिल्लीतील जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज आणि पोलिसी दडपशाहीचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही उमटले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला पुणेकरांनी उत्स्फूर्त व जोरदार प्रतिसाद दिला. या आंदोलनामुळे शहरात केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. Neet Maharashtra Bandh protest pune

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी पुण्यात एका विशाल मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक भिडे वाड्यापासून सुरू झालेला हा मोर्चा कसबा पेठ, दारूवाला पूल, नारपतगिरी चौक मार्गे पुढे जात पुणे रेल्वे स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला. या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने तरुण, विद्यार्थी, विविध सामाजिक व श्रमजीबी संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. हातामध्ये फलक आणि भारताचे राष्ट्रीय झेंडे घेऊन सहभागी झालेला हा जनसमुदाय प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळाला. Neet

Pune Traffic News : पुणेकरांना आज पर्यायी मार्गाचा वापर करा

मोर्चादरम्यान केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो,” “दिल्ली पोलीस मुर्दाबाद” आणि “विद्यार्थ्यांवरील अन्याय चालणार नाही” अशा बुलंद घोषणांनी पुणे स्टेशन परिसर आणि मुख्य रस्ते दणाणून गेले. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे अत्यंत निंदनीय असून, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी ठाम मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.

Pune News : पानशेतच्या विस्थापितांचा ६६ वर्षांचा वनवास संपला

व्यापारी वर्गाचा व विविध संघटनांचा पाठिंबा

या बंदच्या हाकेला शहरातील ३० हून अधिक विविध सामाजिक, विद्यार्थी आणि कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शविला. मोर्च्याच्या मार्गावरील अनेक दुकानदारांनी आणि व्यापारी आस्थापनांनी स्वेच्छेने आपली दुकाने बंद ठेवून या न्याय्य आंदोलनाला पाठिंबा दिला. अनुचित प्रकार टाळावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे शहर पोलीस दलातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच वाहतूक मार्गात तात्पुरते बदलही करण्यात आले होते.

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button