ठाणेमुंबई

Thane News : प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात खळबळजनक वळण; मुलाचा पोलिसांच्या तपासावर गंभीर संशय

Thane News : हेल्मेटधारी मारेकऱ्याची बॉडी लँग्वेज सीसीटीव्ही फुटेजशी जुळत नाही; जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर धरणे आंदोलनाचा इशारा

Thane News : ठाणे :- ठाण्यातील मानपाडा, आझाद नगर आणि मनोरमा नगर परिसरातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता एक नवीन आणि खळबळजनक वाद निर्माण झाला आहे. चार जणांनी कार्यालयात शिरून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्यांची हत्या केल्यानंतर पोलिसांनी सर्व मारेकऱ्यांना जेरबंद केल्याचा दावा केला होता. मात्र, या प्रकरणातील एका 5 व्या आरोपीच्या सहभागावर आणि त्याच्या ओळखीवर खुद्द मृत प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलानेच गंभीर शंका उपस्थित केली आहे.https://maharashtramirror.com/ Thane News

अटक केलेल्या आरोपीची शरीरयष्टी सीसीटीव्हीतील हेल्मेटधारी मारेकऱ्याशी जुळत नाही’ — राम पूर्णेकर

या प्रकरणाबाबत माहिती देताना मृतदीचा मुलगा राम पूर्णेकर म्हणाला की, हल्लेखोरांपैकी एकाच्या डोक्यात हेल्मेट असल्यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले होते, ज्याला पोलिसांनी प्रयागराजमधून ताब्यात घेत अमित सिंग असल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांनी पकडलेल्या या अमित सिंगची शरीरयष्टी आणि सीसीटीव्ही फुटेजमधील हेल्मेटधारी व्यक्तीची बॉडी लँग्वेज अजिबात जुळत नाही. “जो पाचवा आरोपी पकडला आहे, तो कुठल्याही अँगलने हेल्मेट घातलेला वाटत नाही आणि त्याचे बॉडी स्ट्रक्चरही तसे नाही, हे कोणीही बघून सांगू शकेल,” असा दावा राम पूर्णेकर यांनी केला असून, यामुळे ठाणे पोलिसांच्या तपासावर आणि कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; हत्येतील शस्त्रे व मास्टरमाइंडचा शोध सुरू

या गंभीर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे.

सुभाष उर्फ पप्या शिंदे: 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी.

संतोष उर्फ टल्ली आणि अमित सिंग: 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी.

पोलिसांच्या दाव्यानुसार हत्येसाठी दोन पिस्तूल आणि तीन चॉपर वापरण्यात आले होते, मात्र त्यापैकी आतापर्यंत केवळ एकच पिस्तूल हस्तगत करण्यात आले असून रक्ताळलेले कपडे व इतर शस्त्रांचा शोध सुरू आहे. तसेच आरोपींना पैसे पुरवणारे व फरार होण्यास मदत करणाऱ्यांचाही कसून शोध घेतला जात आहे.

‘जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर बसणार’ — राम पूर्णेकर यांचा इशारा

या संपूर्ण प्रकरणात संताप व्यक्त करताना राम पूर्णेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, “जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत नवरात्रीचे नऊ दिवस संपायच्या आधी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर जाऊन बसणार आणि माझ्या वडिलांसाठी न्याय मागणार. मुख्य प्रकरणातील ओरिजिनल मास्टरमाइंड समोर आलेच पाहिजेत.” तसेच या प्रकरणात मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांचे नाव घेऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची सीबीआय (CBI) आणि सीआयडी (CID) चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button