पुणे

Pune News : बियाँड ऑटोमेशन”मधून युवा नेतृत्वाला नवी दिशा; ‘रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्ड्स’ उत्साहात संपन्न

Pune News :पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना मानवी बुद्धिमत्ता,नैतिक मूल्ये,सचोटी आणि नेतृत्वक्षमता यांचे महत्त्व अधोरेखित करणारा ‘बियाँड ऑटोमेशन – ऑटोमेशनच्या पलीकडे’ ही या संकल्पने वर आधरित ,‘रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्ड्स’(RYLA)२०२६ हा तीन दिवसीय युवा नेतृत्व विकास कार्यक्रम लवासा येथे उत्साहात पार पडला.रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिस्ट(CHRIST) (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी)येथे नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.https://maharashtramirror.com/ Pune News

या कार्यक्रमाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे अध्यक्ष कमोडोर परवीन मल्होत्रा, माजी अध्यक्ष सुहास मर्चंट व संजय करवा,अध्यक्ष-निर्वाचित डॉ.गोपी शेट्टी,एअर कमोडोर पंकज मेहरोत्रा(निवृत्त),रोटरी क्लब ओफ पुना एअर पोर्टचे अध्यक्ष नरेश पॉल,नीलम मेहरोत्रा आणि कॅप्टन मीनू रुसी वाडिया (निवृत्त)उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Pune News

कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरीचे माजी अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाले.रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे अध्यक्ष कमोडोर परवीन मल्होत्रा यांनी नेतृत्व म्हणजे केवळ पद किंवा अधिकार नसून ती एक जबाबदारी आहे असे सांगितले.नेतृत्वाची संधी मिळण्याची वाट न पाहता तरुणांनी आजपासूनच आपल्या कृतीतून पुढाकार आणि नेतृत्वगुण दाखवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

रोटरी इंटरनॅशनलच्या या महत्त्वपूर्ण युवा उपक्रमातून तरुणांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास,संघभावना,निर्णयक्षमता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित करण्यावर भर देण्यात आला.यशस्वी विद्यार्थ्यांना‘रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्ड्स’ प्रदान करण्यात आली.

समारोप समारंभात लेफ्टनंट जनरल राजेंद्र रावसाहेब निंभोरकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सी स्काऊट्स अँड गाईड्स, इंडिया यांच्या पथकाने डॉ. गोपी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेली शिस्तबद्ध मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर).कार्यक्रमाचे संयोजन क्लबचे माजी अध्यक्ष संजय करवा यांनी केले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button