Thane Crime News : घरात चोरी, चोरट्याने सोन्याचे दागिने केले लंपास
•चार लाख साठ हजार रुपयाचे दागिने चोरीला, कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे :- खारेगाव कळवा या परिसरात राहणाऱ्या एका शिंदे परिवाराच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याची घरातली सोन्याचे दागिने लंपास केले असून दागिऱ्याची किंमत साधारण चार लाख साठ हजार रुपये इतके आहे. फिर्यादी यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Thane Crime News
रमेश महादेव शिंदे, (61 वर्ष), खारेगाव, कळवा, ठाणे पश्चिम यांचे राहते घराच्या दरवाज्याचे लॉक कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन त्यावाटे आत प्रवेश करून घरातील एकुण 4 लाख 60 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने घरफोडी चोरी करून नेले आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द भा.द.वि.कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वल्टे हे करीत आहे. Thane Crime News