Mumbai Crime News : मुंबईत बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ; बँकेत लोन मिळवून देतो अशी बतावणी करून नागरिकांची फसवणूक

•कॉल सेंटर चालवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे, या छापेमारीत पोलिसांनी सात जणांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे
मुंबई :- बजाझीन हॉलिडे ट्रॅव्हल्स कंपनी मधून येथून बोलत असल्याचे सांगून बँकेतून तात्काळ लोन प्राप्त करून देतो अशी बतावणी करून फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन बेकायदा कॉल सेंटरच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणी एकूण सात जणांना अटक केली आहे त्यामध्ये चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 15 मोबाईल फोन, चार लॅपटॉप, 49 एअरटेल कंपनीचे सिम कार्ड, वोडाफोन कंपनीचे आठ सिम कार्ड,एक प्रिंटर असा एकूण चार लाख पंधरा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या आधीच राहणारे प्रवीण सोळंकी यांना अनोळखी व्यक्तीने कॉल करून ते बजाझीन हॉलिडे ट्रॅव्हल्स कंपनी मधून बोलत असल्याचे सांगून ऑनलाईन लोन मिळून देतो असे सांगितले. तसेच लोन प्रोसेसिंग करिता आरोपींनी फिर्यादी कडून दोन लाख 60 हजार रुपयाची ऑनलाईन रक्कम फिर्यादीने ती रक्कम पाठविले परंतु लोन मंजूर न करता फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात त्यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 318(4),319(2) भारतीय न्यायसंहितासह कलम 66 (सी),66 (डी) आय.टी. ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास घेतला असता आरोपी हे पवई प्लाझा, जे.व्ही.एल.आर रोड, पवई मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने या ऑनलाइन कॉल सेंटरवर छापा टाकत पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, tuविषेश पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, सत्य नारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग परमजितसिंग दहिया, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-9 दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त, सांताकुड़ा विभाग मारुती पंडित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे), रणजीत आंधळे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत, पोलीस उपनिरीक्षक विजय सरदेसाई, पोउनि श्री. जितेन गांवकर, सफी श्री. पाठक, पोलीस हवालदार चाबुकस्वार, हंचनाळे, पोलीस शिपाई सुरवसे, राणे, सावकारे, गावडे,पाटील, दिवाणजी, वसावे,मुंजवटे, काकडे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.