Pune Reverse Car Accident : पुण्यातील त्या अपघात कारचा व्हिडिओ व्हायरल

•पहिल्या मजल्यावर पार्किंग केलेल्या कार खाली पडल्याचा व्हिडिओ व्हायरल
पुणे :- शहरात अनेक अपघात होत असताना आपण पाहिले आहे. परंतु, पुण्यात एक वेगळाच अपघात पाहायला मिळाला आहे. रविवारी पुण्यातील विमान नगर परिसरातील थरारक घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज मध्ये कॅप्चर झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
पुण्यातील विमान नगर परिसरातील दुसऱ्या मजल्यावर पार्किंग मधील कार खाली कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या कारमध्ये काही प्रवासी असल्याचे पाहायला मिळते. परंतु सुदैवाने कोणतीही इजा या अपघातात झाली नसल्याचे समजते. कारचालक पार्किंग मधील कार काढताना चुकून पुढचा घेर टाकण्याऐवजी मागचा घेर टाकतो त्यामुळे पार्किंग मधील कार इमारतीची भिंत तोडून खाली कोसळते. अपघात पाहताच आजूबाजूच्या परिसरातील काही नागरिक कारमधील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.
व्हायरल व्हिडिओ?