Thane Crime News : ठाण्यात चोरी ; पाच लाखाहून अधिक सोन्याच्या किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला
•Thane Crime News महिलेच्या घरी चोरी, सोन्याच्या दागिने, रोख रक्कम घेऊन चोरटा लंपास
ठाणे :- एका महिलेच्या घरात सोन्याच्या दागिने आणि रोख रक्कम ची चोरी झाली असून सोन्याच्या दागिन्याची आणि रोख रक्कम असे मिळून पाच लाख दहा हजार रुपयाची चोरी महिलेच्या घरात झाली आहे. या महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. अपूर्वावडे पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. Thane Crime News
फिर्यादी महिला, (37 वर्ष) रा.कोलशेत रोड, ठाणे पश्चिम यांचे राहते घरात कोणीतरी अज्ञात चोरटयाने प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 5 लाख 10 हजार रुपये किमंतीचा ऐवज फिर्यादी यांचे संमतीशिवाय चोरी करून नेला आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा भा. द.वि.कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहे. Thane Crime News