Dombivli Crime News : डोंबिवलीत कंपनीमध्ये चोरी ; कॉपर मटेरियल चोरीला
Dombvli Crime News Thief Stolen Copper Wire From Company : चार लाखाहून अधिक कॉपर मटेरियल चोरीला, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
डोंबिवली :- सोनारपाडा परिसरात असलेल्या एका कंपनीमध्ये कंपनीमध्ये चोरट्याने चोरी केली आहे. कॉपर मटेरियल चोरीला गेला असून जवळपास चार लाखाहून अधिक किमतीचे चोरी झाल्याची घटना मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असून फिर्यादी यांच्या सांगण्यावरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. Dombvli Crime News
आनंद शंकर राजगुरू, (42 वर्ष) मॅनेजर हे काम करीत असलेल्या आच्छु प्रेसेशन प्रा.लि. या कंपनीच्या विनोद म्हात्रे चाळ, गाळा नं.4, डोंबिवली पूर्व या वर्कशॉपचे मागील भिंतीचा पत्रा कोणीतरी अज्ञात चोरटयाने उचकटुन त्यावाटे आत प्रवेश करून वर्कशॉपमधील एकुण 4 लाख 32 हजार 846 रुपये किमंतीचे कॉपर मटेरियल व डीव्हिआर मॉडेल घरफोडी चोरी करून नेले आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि.कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे हे करीत आहे. Dombvli Crime News