क्राईम न्यूजपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र
मोरवाडी येथे ग्रेड सेपरेटर मध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडी
पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गा वरील ग्रेट सेपरेटर मध्ये एका तरुणाने काही वेळापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

पिंपरी: मोरवाडी येथील ग्रेट सेपरेटर मध्ये उडी मारून एका 30 ते 35 वयोगटातील तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे मोरवाडी येथून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने तरुणाला रुग्णवाहिकेच्या सहाय्याने वायसीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवला आहे.



