Pune crime : महामार्गांवर वाहनांचा ताफा, वाहतूक कोंडी अन रिल्स; तिघांना अटक
Pune crime : ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी उत्तर महाळुंगे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यावर काही तरुणांनी त्यांची चार आलिशान वाहने रस्त्याच्या मधोमध उभी केली
Pune crime : पिंपरी: सोशल मीडियावर प्रसिद्धी, लाइक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या हव्यासापोटी सार्वजनिक रस्त्यांवर वाहने अडवून रील्स बनवणाऱ्या बेजबाबदार तरुणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कठोर कारवाई केली. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संत तुकाराम चौक ते मिंडेवाडी रस्त्यावर चार महागड्या गाड्या समांतर चालवून, मध्येच थांबवून आणि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शूटिंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चार तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime
३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास उत्तर महाळुंगे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यावर काही तरुणांनी त्यांच्या ताब्यातील चार आलिशान वाहने रस्त्याच्या मधोमध उभी केली. मागून येणाऱ्या इतर वाहनधारकांचा रस्ता अडवून, अचानक गाड्यांचा वेग कमी-जास्त करत आणि एकमेकांना समांतर गाड्या चालवून धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी केली. या संपूर्ण प्रकाराचे कॅमेरा व ड्रोनद्वारे चित्रीकरण करून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune crime
हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांच्या मदतीने आरोपी आणि वाहनांची ओळख पटवली. राम हिरामण राऊत (रा. ता. खेड), साहिल बारकु जांभळे (रा. ता. खेड), आदित्य कैलास निखाडे (रा. ता. खेड) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांचा साथीदार प्रणव मालक पाचपुते (रा. ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फॉर्च्युनर (एमएच १४/एनएन ०००५), स्कॉर्पिओ (एमएच १४/ ईसी १६५८), स्विफ्ट (एमएच १४/ एचडब्ल्यू ४७०८), फ्राँक्स (एमएच १४/एलएल २५२०) ही वाहने ताब्यात घेतली आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime
पुणे-बंगळुरू महामार्गावरही रिल्ससाठी वाहतूक कोंडी
काही दिवसांपूर्वी मुंबई-बेंगळुरू महामार्गावर नवीन आलिशान गाड्या रस्त्यावर उभ्या करून चित्रीकरण करण्यात आले होते. यामुळे बाणेर, भुजबळ चौक आणि वाकड परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी बावधन पोलिसांनी कार मालक, फोटोग्राफर आणि चालकांवर गुन्हे दाखल केले होते. नवीन कार खरेदी केल्यानंतर आपला ग्रुप वेगळा आहे हे दाखवण्यासाठी आणि श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी तरुण महामार्गाचा वापर शूटिंगसाठी करत आहेत. अशा रील्सबाजीमुळे रुग्णवाहिका, अग्निशामक दल यांसारख्या अत्यावश्यक सेवांनाही अडथळा निर्माण होतो.
कोट –
“महाळुंगे एमआयडीसी मधील रस्त्यांवर काढलेला व्हिडीओ समोर येताच याची गांभीर्याने दखल घेत संबंधितांचा शोध घेतला आहे. अशा प्रकारे वाहतुकीस अडथळा करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची वाहने देखील जप्त केली आहेत.” – श्वेता खेडकर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार



