Delhi News : जमावबंदी झुगारून जंतर-मंतरवर तिरंगा फडकवणारे सीजेपी नेते ताब्यात; 10 ऑक्टोबरच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा धडक कारवाई
Delhi News : नवी दिल्ली :- दिल्लीत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी जंतर-मंतरवर जाण्यापासून सक्त मज्जाव असताना आणि जमावबंदी लागू असतानाही कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) नेते धडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरव दास, अजिंक्य शिंदे आणि आशुतोष रांका या तीन नेत्यांना त्यांच्या काही मित्रांसह जंतर-मंतर परिसरातून पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे नेते जंतर-मंतरवर पोहोचले होते, मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांची धरपकड केली.https://maharashtramirror.com/ Delhi News
आशुतोष रांका आणि सीजेपीच्या नेत्यांची धरपकड; पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ समोर
सीजेपी आणि आशुतोष रांका यांनी पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सीजेपीचे नेते जंतर-मंतरवर पोहोचल्याचे आणि रांका यांच्यासह त्यांचे समर्थक हातात तिरंगा झेंडे व फलक घेऊन ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करताना स्पष्ट दिसत आहेत. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमल्यानंतर अवघ्या काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलक तरुणांची व नेत्यांची धरपकड केली आणि त्यांना बळजबरीने पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवून नेले. सरकारने आंदोलनांच्या अधिकृत यादीतून जंतर-मंतर हे ठिकाण पूर्णपणे वगळल्यामुळे सीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
नरेंद्र मोदी घाबरले आहेत, आता संपूर्ण देश जंतर-मंतर बनेल’ अभिजीत दीपके
या संपूर्ण घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारवर अत्यंत घणाघाती हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुरते घाबरले आहेत, म्हणूनच त्यांनी आंदोलनांच्या यादीतून जंतर-मंतरचे नाव काढून टाकले आहे. त्यांना वाटते की आता इथे आंदोलने पूर्णपणे बंद होतील, परंतु तसे कधीही होणार नाही. आशुतोष रांका यांचा जंतर-मंतरवर तिरंगा फडकवतानाचा फोटो शेअर करत दीपके यांनी, आंदोलकांचे आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आता संपूर्ण देशच जंतर-मंतर बनेल, असा इशारा दिला आहे.
10 ऑक्टोबरच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा पोलिसांची धडक कारवाई
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आंदोलनांवरून मोठे राजकीय संघर्ष सुरू आहेत. याआधी 10 ऑक्टोबर रोजी सीजेपीने जंतर-मंतरवर मोठे आंदोलन करण्याचे जाहीर केले होते, मात्र आंदोलनाच्या दिवशीच पोलिसांनी विमानात घुसून अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले होते. त्या दोन दिवसांच्या काळात पोलिसांनी तब्बल 7 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली होती. नेत्यांना अगोदरच ताब्यात घेतले असतानाही तरुणांनी मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर गर्दी करून जोरदार प्रदर्शन केले होते, आणि आता पुन्हा एकदा नेत्यांना ताब्यात घेतल्यामुळे राजधानीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



