Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपोच्या भ्रष्टाचाराचा आका कोण ?

Moshi Building Collapse: कचऱ्याचा हा डेपो म्हणजे भ्रष्टाचाराचे मोठे कुरण
Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर कचऱ्यातील भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या निविदांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. हा डेपो म्हणजे भ्रष्टाचाराचे मोठे कुरण असून कचऱ्यातून फक्त पैसा खाल्ला जातो. मोशी कचरा डेपोच्या भ्रष्टाचाराचा आका कोण, असा सवाल शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. ( Moshi Building Collapse corruption shrirang barne target )

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (९ जुलै) दुपारी बारा वाजता मोशी कचरा डेपो येथे भेट देत पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे आदी यावेळी उपस्थित होते. ( Moshi Building Collapse )
मोशी कचरा डेपोमध्ये गेल्या ३५ वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या ८१ एकर जागेवर कचऱ्याचे मोठमोठे डोंगर उभे राहिले आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट लावत कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी आतापर्यंत पाचशे कोटीपर्यंत खर्च करण्यात आला आहे. मात्र, तरीही कचऱ्याचे डोंगर तसेच आहे. यामधील एक कचऱ्याचा डोंगर प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर अपघाता झाला. त्यानंतर आता या कचरा डेपोमधील भ्रष्टाचाराचा आका कोण आहे ? असा आरोपी खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. ( Moshi Building Collapse )

कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराने नियम व अटी पाळल्या आहेत की नाही, याची चौकशी झाली पाहिजे. ज्याठिकाणी कचरा संकलन केले जाते अशा ठिकाणी इमारत बांधण हे निव्वळ मूर्खपणाच लक्षण आहे. यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवत असताना मोठा निधी केंद्र सरकारने दिला आहे. असे असताना याठिकाणी अशी बांधकामे करत सरकारची फसवणूक करणे हा गुन्हा आहे. महापालिका आयुक्त जर कोणाला पाठिशी घालत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असा इशारा बारणे यांनी दिला आहे.
A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
मोशी कचरा डेपो हा भ्रष्टाचाराच कुरण आहे. या घटनेला पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी हे जबाबदार आहेत. त्यांच्या बडतर्फीसह त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. तसेच कार्यकारी अभियंता म्हणून योगेश आल्हाट यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांची पदवी बोगस असल्याची तक्रार नगरविकास विभागाकडे करण्यात आली आहे. हा प्रकल्प करत असताना कचऱ्याच्या ढीगाची उंची २० मीटरपेक्षा अधिक नसावी असा नियम आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला निलंबित केले पाहिजे. याठिकाणी अनेक काम सबठेकेदार करत आहेत. त्यामध्ये येथील स्थानिकांचा सहभाग असून त्यामधील आका कोण आहे? याचा शोध घेतला पाहिजे. एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी केली. ( Moshi Building Collapse )

दोन महिन्यापुर्वी याठिकाणी ढिगारा कोसळला होता. परंतु याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. बायोमायनिंगचे काम ज्या संस्थेला देण्यात आले आहे. त्यांची जबाबदारी होती. त्यांनी हा ढिगारा पावसाळ्यापुर्वी इतरत्र हलविणे आवश्यक होते. पावसामुळे इमारतीच्या संरचनेवर परिणाम झाला, असे वरवरचे कारण सांगून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. कचऱ्याचे ढीग वेळीच हटवले गेले असते किंवा यापूर्वीच संभाव्य धोका लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेतली असती, तर आज या निरपराध कामगारांचे प्राण धोक्यात आले नसते.
– भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेता
A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)



