महाराष्ट्र

Pune News : नवरात्रोत्सवामुळे साबुदाणा, भगरला मागणी; उत्पादन घटल्याने दरात वाढ

Pune News : पुणे : नवरात्रोत्सव आणि उपवास हे समीकरण असल्याने या काळात साबुदाणा आणि भगरला मोठी मागणी असते. यंदाही उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली असून, उत्पादनात घट झाल्याने साबुदाणा आणि भगरच्या दरात वाढ झाली आहे.दरवर्षी नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच साबुदाणा आणि भगरच्या मागणीत वाढ होते. यंदा मात्र कमी पावसामुळे या पदार्थांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी, बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमी होत आहे. कंपन्यांनी दर वाढविल्याने घाऊक तसेच किरकोळ बाजारातही ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज साबुदाण्याची ६० ते ८० टन, तर भगरची ५० ते ७० टन आवक होत आहे. भगरची आवक नाशिक येथून, तर साबुदाण्याची आवक तामिळनाडूतील सेलम भागातून होत असल्याची माहिती साबुदाणा व भगर व्यापारी आशिष दुगड यांनी दिली.
मागील वर्षी साबुदाणा आणि भगरचे उत्पादन चांगले झाल्याने दर स्थिर होते. यंदा उत्पादनात घट झाल्यामुळे साबुदाण्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. भगरचे दरही वाढले आहेत. नवरात्रोत्सवानंतर दसरा आणि दिवाळी हे सण असल्याने बाजारात उपवासाच्या पदार्थांसह इतर खाद्यपदार्थांनाही मागणी राहणार आहे. त्यामुळे आगामी काळातही साबुदाणा आणि भगरचे दर चढे राहण्याची शक्यता आहे.

बाजारातील साबुदाणा आणि भगरचे दर
साबुदाणा क्रमांक १ : ८५ रुपये किलो
साबुदाणा क्रमांक २ : ८० रुपये किलो
भगर क्रमांक १ : २२५ रुपये किलो
भगर क्रमांक २ : २१० रुपये किलो

उत्सवामुळे मागणी कायम
उत्पादनातील घट आणि वाढती हंगामी मागणी यामुळे बाजारात साबुदाणा आणि भगरचे दर वाढले आहेत. नवरात्रोत्सवात उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने या पदार्थांना मागणी कायम राहणार आहे. आगामी काळातही सण-उत्सव असल्याने दर चढे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी गरजेनुसार आणि नियोजनपूर्वक खरेदी करावी.

— आशिष दुगड, साबुदाणा व भगर व्यापारी, मार्केट यार्ड

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button