Tukaram Mundhe : हॉटेलनंतर आता दूध व्यावसायिक रडारवर!

Tukaram Mundhe : ‘फार्म टू प्लेट’ संकल्पनेनुसार संपूर्ण साखळीवर राहणार करडी नजर
मुंबई, महाराष्ट्र मिरर
Tukaram Mundhe : राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने कंबर कसली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना नियमांच्या चौकटीत आणल्यानंतर, आता ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढे ( Tukaram Mundhe) यांनी आपला मोर्चा दूध भेसळखोरांकडे वळवला आहे.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या साखळीत गुंतलेल्या सर्वांसाठी प्रशासनाने अत्यंत कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्त मुंढे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. (tukaram mundhe action on milk adulteration fda rules)
“ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारी कोणतीही छेडछाड खपवून घेतली जाणार नाही. ‘फार्म टू प्लेट’ म्हणजेच दुधाच्या उत्पादनापासून ते ग्राहकाच्या ताटापर्यंत पोहोचण्याच्या संपूर्ण प्रवासावर आमचे नियंत्रण असेल,” असे मुंढे यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
Sting Drink Ban: शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ ड्रिंकच्या विक्रीवर बंदी
आठ प्रकारच्या मानकांची कडक अंमलबजावणी
पत्रकार परिषदेत माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे ( Tukaram Mundhe) म्हणाले की, दूध सुरक्षिततेसाठी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ तसेच २०११ च्या नियमावलीतील तरतुदींचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य आहे. यासाठी मुख्यत्वे आठ प्रकारच्या मानकांची (Standards) कडक अंमलबजावणी केली जाणार आहे:
दूध उत्पादकापासून ते अंतिम विक्रेत्यापर्यंत सर्वांकडे २०११ च्या नियमांनुसार वैध परवाना किंवा नोंदणी असणे बंधनकारक आहे.
दुधावर प्रक्रिया करताना आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करताना वापरल्या जाणाऱ्या घटकांवर (Additives) नियमांनुसार मर्यादा असेल.
https://www.instagram.com/reel/DWzLH3hEnQW/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
दुधात हानिकारक रसायने, अँटीबायोटिक्स किंवा जड धातूंचे अवशेष आढळल्यास थेट कायदेशीर कारवाई होईल.
नियमाबाह्य किंवा असुरक्षित दूध आणि पदार्थांच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्यात येईल.
पॅकबंद दुग्धजन्य पदार्थांवर उत्पादनाची तारीख, मुदत संपण्याचा दिनांक (Expiry) आणि घटकांची माहिती स्पष्ट भाषेत असणे आवश्यक आहे. तसेच अन्न सुरक्षा पॅकेजिंग नियमांचे पालन करावे लागेल.
उत्पादनाबाबत ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा खोटे दावे केल्यास कडक कारवाई केली जाईल.
RTI: माहिती अधिकार कायद्यातील जाचक बदलांना अखेर स्थगिती
कोणावर असणार वॉच?
अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेले हे नवे नियम केवळ मोठ्या कंपन्यांपुरते मर्यादित नसून, दुधाच्या व्यवसायातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत लागू राहतील. यामध्ये प्रामुख्याने खालील घटकांचा समावेश आहे:
- दूध संकलन केंद्रे (Collection Centres) आणि शीतकरण केंद्रे (Chilling Centres).
- दुग्ध प्रक्रिया युनिट्स, उत्पादक, पॅकर्स आणि फिलिंग स्टेशन्स.
- घाऊक (Wholesale) व किरकोळ (Retail) विक्रेते, वितरक आणि वाहतूकदार.
- विशेष नोंद: गल्लोगल्ली सुटे दूध विकणारे छोटे व्यावसायिकही या नियमांच्या कक्षेत येतील.
केवळ दूधच नव्हे, तर दुधापासून तयार होणाऱ्या सर्वच उपपदार्थांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. सणासुदीच्या काळात किंवा सामान्य दिवसांतही सर्वाधिक भेसळ होणारे पनीर, खवा, तूप, लोणी, क्रीम, दही, आईस्क्रिम, चीज, दूध पावडर, फ्लोअर मिल आणि इतर दुग्धजन्य पदार्थ आणि त्याचे उत्पादक यांनाही वरील मानके लागू असणार आहेत.
Pune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: २.८५ लाखांचा बेकायदेशीर हुक्का फ्लेवर जप्त
या सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. जेणेकरून ग्राहकाच्या थाळीत सुरक्षित आणि दर्जेदार दूध पोहोचेल. त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा छेडछाड असणार नाही, अशी भावना तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली. ( Tukaram Mundhe)
सुट्या दूध विक्रेत्यांनाही चाप
अनेकदा ब्रँडेड कंपन्यांच्या दुधापेक्षा सुट्या दुधामध्ये पाणी किंवा इतर घातक पदार्थांची भेसळ होण्याचे प्रमाण अधिक असते. यावर बोट ठेवत आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले की, सुटे दूध विकणाऱ्यांनाही स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेच लागतील. दुधाची वाहतूक करणाऱ्या गाड्या आणि टँकर्सचीही अचानक तपासणी केली जाईल.( Tukaram Mundhe)
ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड नाही
“अन्न सुरक्षा कायद्याचे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि सकस अन्न मिळवून देणे हे आहे. उत्पादक, प्रक्रियादार आणि विक्रेते या सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. ग्राहकाच्या थाळीत पोहोचणारे दूध १००% सुरक्षित आणि दर्जेदार असायला हवे.
जर कोणी नफा कमावण्यासाठी मानवी आरोग्याशी खेळ करत असेल, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असा इशारा मुंढे यांनी शेवटी दिला. या मोहिमेसाठी राज्यभरात विशेष पथके तैनात करण्यात आली असून, संशयास्पद नमुने जप्त करून प्रयोगशाळेत पाठवण्याची प्रक्रिया वेगवान केली जाणार आहे.( Tukaram Mundhe)

