Mumbaiमहाराष्ट्र

Mumbai News : संजय राऊत यांचा मोठा दावा: देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपद देण्याची तयारी

Mumbai News : मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपदाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारसदार म्हणून फडणवीस यांना पुढे करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) भूमिका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, संघाच्या आतल्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी मंत्रिमंडळात सध्या नसलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याला आधी उपपंतप्रधान केले जाईल आणि नंतर मोदींचे वारसदार म्हणून पुढे आणले जाईल. ही माहिती लवकरच स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ‘पीएम इन वेटिंग’ असणारे लोक कधीही पंतप्रधान होत नाहीत आणि सध्या देशात पंतप्रधानपदासाठी कोणतीही जागा रिकामी नाही, असे विधान केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेत संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेवरून राजकीय चर्चांना उधाण आणले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button