पिंपरी चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्रविशेष

Pune News : मंगळवारी दसरा साजरा होणार; दुपारी २.१९ ते ३.०६ विजय मुहूर्तमहानवमी, विजयादशमी आणि नवरात्रोत्थापन २० ऑक्टोबर रोजी

Pune News :पुणे – विजयाचे प्रतीक मानला जाणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण मंगळवारी,(दि.२०) साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी महानवमी आणि नवरात्रोत्थापनही होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी दुपारी २ वाजून १९ मिनिटे ते ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त असल्याची माहिती पंचांगानुसार देण्यात आली आहे. हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. प्रभू श्रीरामांनी रावणावर मिळवलेला विजय आणि देवी दुर्गेने महिषासुराचा केलेला वध यांचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. दसरा हा सत्याचा असत्यावर, चांगुलपणाचा वाईटावर आणि न्यायाचा अन्यायावर विजय मिळवण्याचा संदेश देणारा सण मानला जातो.https://maharashtramirror.com/ Pune News

नवरात्रोत्सवाची सांगता दसऱ्याच्या सणाने होत असल्याने या दिवशी देवीची पूजा, शस्त्रपूजन, वाहनपूजन तसेच आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी नवीन कामांचा शुभारंभ, खरेदी आणि व्यवसायाची सुरुवात करण्यासाठीही दसऱ्याचा दिवस शुभ मानला जातो. विजय मुहूर्तामध्ये पूजा-अर्चा करून विजयादशमी साजरी करतात. श्रद्धा, उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात दसरा साजरा करण्यात येतो. “यंदा महानवमी आणि विजयादशमी एकाच दिवशी आल्याने भाविकांनी सकाळी देवीची पूजा करून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर नवरात्रोत्थापन करून दसरा पूजन करावे. सर्व धार्मिक विधी आपल्या घरातील परंपरेनुसार आणि पंचांगातील शुभमुहूर्तानुसार करावेत.”

— श्रीधर व्यास, पौरोहित्य गुरूजी

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button