Mumbai Local Bomb Blast : मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपी निर्दोष! हायकोर्टाचा मोठा निकाल

•Highcourt Decision On Mumbai Local Bomb Blast भाजपा-शिवसेनेची तीव्र प्रतिक्रिया; “संपूर्ण चौकशी अपयशी, सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे”
मुंबई – 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने सोमवारी एक धक्कादायक निकाल दिला. या स्फोटप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या 12 आरोपींना अपुर्या पुराव्यांमुळे निर्दोष घोषित करत त्यांची तत्काळ मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस. चांडक यांच्या खंडपीठाने 2015 मध्ये झालेल्या शिक्षेच्या निर्णयाला पलटवले. त्यावेळी 5 आरोपींना फाशी आणि 7 आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की, अभियोजन पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरला आणि आरोपींना शंका असल्याच्या फायद्याचा आधार देण्यात आला.
या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “हा निकाल दुःखद आणि धक्कादायक आहे. निश्चितच तपास आणि कायदेशीर सादरीकरणात गंभीर चुका झाल्या असाव्यात. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे की, या प्रकरणासाठी स्वतंत्र तज्ज्ञ समिती गठीत करण्यात यावी आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचारासाठी दाद मागावी.”
शिवसेना नेते व खासदार नरेश महस्के यांनीही तपास यंत्रणांवर सवाल उपस्थित करत म्हणाले, “जर सर्व आरोपी निर्दोष सुटले असतील, तर हा तपासाचा आणि तत्कालीन सरकारचा गंभीर अपयश आहे. मुंबईकरांवर घातलेला हा घाव आहे, आणि ते न्यायासाठी आजही वाट पाहत आहेत.”



