Pune News : विधीसंघर्षग्रस्त मुलांच्या वयाबाबत शासनानं पुनर्विचार करावा; पोर्शे कार अपघात प्रकरणातील मृत मुलांच्या पालकांची मागणी
Pune News : पुणे: कल्याणीनगर परिसरात १९ मे २०२४ रोजी झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात अनीश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणाची देशभरात चर्चा झाली होती. पोर्शे कार अपघात प्रकरणात मृत झालेल्या अनीश अवधिया यांचे आई-वडील ओम अवधीया आणि सविता अवधीया यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पोलीस प्रशासन, माध्यम आणि पुणेकरांचे आभार मानले. पुणेकर नागरिकांनी पोर्शे प्रकरणाबाबत आवाज उठविला होता. त्याबाबत मृत अनीश अवधिया यांचे आई-वडील ओम अवधीया आणि सविता अवधीया पालकांनी आभार मानले. तसेच त्यांनी विधीसंघर्षग्रस्त मुलांच्या वयाची १८ अट वरून १६ करावी, अशी मागणी केली.https://maharashtramirror.com/ Pune News
अनिशचे वडील ओम अवधीया म्हणाले की, पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणेकर नागरिक, माध्यम आणि पोलीस प्रशासनाने आमची साथ दिली. तसेच चांगल काम केले आहे. त्याबाबत आम्ही आभार मानण्यासाठी आलो आहोत. हे प्रकरण झाल्यावर कोणत्याही दबावाखाली न येता पोलीस प्रशासनाने चांगल काम केले आहे. त्यांनी योग्य पद्धतीने तपास केला आहे. या अपघातात आमच्या मुलाचा मृत्यू झाला. आमचे झालेले नुकसान कधीही भरून निघणार नाही. आज देशभरात अनेक प्रकरणात अल्पवयीन मुले (विधीसंघर्षग्रस्त बालक) आरोपी असतात. त्यांच्याकडून कितीही मोठा गुन्हा घडला तरी अल्पवयीन असल्याने तत्काळ जामीन मिळतो. जे आमच्यासोबत घडले आहे, भविष्यात असे कोणासाठीही होऊ नये, अशी आमची मागणी आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या वयाबाबत शासनाने पुनर्विचार केला पाहिजे. विधीसंघर्षग्रस्त 18 अट आहे. ती 16 वर्ष केली पाहिजे. त्यांना कायद्याचा धाक काय आहे, हे कळेल, अशी आमची मागणी आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पुण्यातील कल्याणी नगर येथील पुणे हिट अँड रन प्रकरणात त्या अल्पवयीन मुलासह त्याचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह दोन्ही बार मालक तसेच त्या बारचे मॅनेजर आणि आता ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर यांनाही अटक करण्यात आली होती. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या ससूनच्या डॉक्टरने तर सगळ्यांची नावं उघड करेन, अशी धमकीच दिली होती. सर्वोच्च न्यायालयानं विशाल अग्रवाल यांना मार्च २०२६ मध्ये जामीन मंजूर केला. २२ महिन्यांपासून विशाल अग्रवाल तुरुंगात आहेत.



