आरोग्यपुणे

Pune Medical News : एमएमसी नोंदणीचा मार्ग मोकळा

होमिओपॅथिक डॉक्टरांच्या एकजुटीच्या लढ्याला मोठे यश

Pune Medical News : होमिओपॅथिक डॉक्टरांच्या एकजुटीच्या लढ्याला मोठे यश

पुणे महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणी प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे.


पुणे महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणी प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला दिलेले पत्र रद्द केले आहे. त्यामुळे पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणी प्रक्रियेचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे. शासनाने गुरूवारी (दि. २०) जारी केलेल्या पत्राद्वारे १८ ऑगस्टचे पत्र रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणासंदर्भात झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Medical News
या पार्श्वभूमीवर होमिओपॅथिक डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांची भेट घेऊन सीसीएमपी पात्र डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीचा प्रश्न मांडला. बैठकीत नोंदणी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. https://maharashtramirror.com/ Pune Medical News
शिष्टमंडळात डॉ. अमोल आंबेकर, डॉ. योगेश भालेराव, डॉ. संतोष अवचार, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. अजय तायडे पाटील, डॉ. प्रकाश राणे, डॉ. अब्रार इनामदार, डॉ. निलेश जाधव, डॉ. राहुल काळभोर, डॉ. शिवकुमार यादव आणि डॉ. सेल्वन सेंथिल कुमार यांचा समावेश होता.
या निर्णयाचे स्वागत करत शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच उर्वरित सर्व पात्र सीसीएमपी डॉक्टरांची एमएमसी नोंदणी प्रक्रिया विलंब न करता तातडीने सुरू करून पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली. https://maharashtramirror.com/ Pune Medical News

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button