पुणेक्राईम न्यूज

Pune News : शिरूरमध्ये घरात शिरलेल्या चोरट्याचा गोळीबार; एक गंभीर

Pune News : घरमालकावर पिस्तुलातून गोळी झाडल्याची तक्रार; मुलीलाही जखमी केले

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : आनंद सोसायटीतील घरात शिरलेल्या चोरट्याने मोबाईल चोरल्यानंतर घरमालकाच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना १६ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. चोरट्याने त्यांच्या मुलीलाही जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
याप्रकरणी जखमी उमेश चंदनमल छाजेड (वय ४३, रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंदाजे २० ते २५ वर्षांच्या अनोळखी चोरट्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, चोरी आणि भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, चोरट्याने स्वयंपाकघराच्या लोटलेल्या दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यानंतर छाजेड यांच्या आईचा मोबाईल चोरला. ‘आता तुला जिवंत सोडत नाही,’ अशी धमकी देऊन छाजेड यांच्या डोक्याचा निशाणा धरत त्यांच्या दिशेने पिस्तुलातून एक गोळी झाडल्याचा आरोप आहे. यात छाजेड गंभीर जखमी झाले आहेत.
चोरट्याने छाजेड यांच्या मुलीच्या हाताला बोचकारून तिलाही जखमी केले. तसेच शेजारी राहणारे अजित शेठ ओसवाल यांच्या घरी घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नकाते पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button