महाराष्ट्र

Jalna News : मागण्या पूर्ण होईपर्यंत उपचार घेणार नाही;मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Jalna News जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण शनिवारी (दि. ५) आठव्या दिवशीही सुरू आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, सरकारकडून सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी कायम ठेवली आहे.https://maharashtramirror.com/ Jalna News
दरम्यान, शुक्रवारपासून मनोज जरांगे यांनी उपचार घेणेही बंद केले आहे. पाणी, सलाईन तसेच वैद्यकीय तपासणी करण्यास त्यांनी नकार दिला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आता कोणतेही उपचार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.https://maharashtramirror.com/wp-admin/post.php?post=52333&action=edit jalna News
‘सरकारने आधी मागण्या पूर्ण कराव्यात, त्यानंतरच मी उपचार घेईन,’ असा ठाम पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, सरकार आणि आंदोलकांमधील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केल्याने उपोषण पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button