क्राईम न्यूजठाणे
Trending

Thane Murder News : कौटुंबिक वादातून पत्नीचा खून ; नवराच खुनाचा मुख्य आरोपी

Thane Latest Murder News : नवऱ्याने केला बायकोचा खून, कौटुंबिक वादातून बायकोला केले ठार, पोलिसांनी खुनी नवऱ्याला तात्काळ अटक केली

ठाणे :- कौटुंबिक वादातून पत्नीचा खून Thane Murder News केला आहे. नवराच खुनाचा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. नवऱ्यानेच पत्नीला धारदार शस्त्राने वार करून तिला जिवेठार मारल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी आरोपी पतीच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात Mumbra Police Station गुन्हा दाखल करून खुनी पतीला तात्काळ अटक करण्यात आले आहे. Thane Latest Crime News

मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, तानाजी म्हात्रे चाळ, म्हात्रे गेट दिवा पूर्व येथे प्रितेश काशिनाथ शिर्के आणि त्याची पत्नी द्रोपती प्रितेश शिर्के (47 वर्ष) यांचे कौटुंबिक वाद होते. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारले आहे. याबाबतचे फिर्याद डोंबिवली पश्चिम मध्ये राहणाऱ्या पत्नीच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा बी.एन.एस.कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खुनी नवऱ्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. गुन्हयातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तोरडमल करत आहे. Thane Latest Crime News

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button