मुंबई

Mumbai News : पद्मावतमधील जौहरच्या दृश्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया


Mumbai News मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्करने ‘पद्मावत’ चित्रपटातील जौहरच्या दृश्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. लैंगिक हिंसाचारातून गेलेल्या महिलांसाठी अशी दृश्यं त्रासदायक ठरू शकतात का, असा मुद्दा स्वरा भास्करने मांडला होता. याबाबत माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारला. मात्र, त्यांनी स्वरा भास्करच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “त्यांनी त्यांचा दृष्टिकोन आणि मत मांडलं आहे, त्यामुळे मला त्यावर उत्तर द्यायचं नाही,” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं.https://maharashtramirror.com/ mumbai news

मात्र, त्यांनी जौहरच्या प्रसंगाच्या संदर्भात त्या काळातील परिस्थिती वेगळी असल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, त्या काळात महिलांकडे आजच्या काळासारख्या कायदेशीर आणि पोलीस यंत्रणांचा आधार नव्हता. त्यामुळे शत्रूच्या हाती लागण्यापेक्षा आत्मसन्मान जपण्यासाठी महिलांनी जौहरचा मार्ग स्वीकारला असावा, असं त्यांनी म्हटलं.https://maharashtramirror.com/ Mumbai news

स्वरा भास्करने या दृश्याच्या परिणामांवर प्रश्न उपस्थित केला, तर अमृता फडणवीस यांनी तत्कालीन परिस्थिती आणि महिलांच्या आत्मसन्मानाचा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे दोघींच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button