Indapur News : पुणे–सोलापूर महामार्गावर मातीचा ढिगारा कोसळला; एक मजूर ठार इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे दुर्घटना
Indapur News :एक कामगार गंभीर जखमी, घटनेच्या चौकशीचे निर्देश
Indapur News :इंदापूर, महाराष्ट्र मिरर : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे उड्डाणपुलाजवळ सुरू असलेल्या बांधकामादरम्यान माती आणि मुरुमाचा ढिगारा कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर जखमी झाला. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर घटनास्थळी बचावकार्य हाती घेण्यात आले.https://maharashtramirror.com/ Indapur News
बांधकाम सुरू असताना ढिगारा कोसळला
राजवडी येथे महामार्गालगत सर्व्हिस रोड आणि संरक्षण भिंतीचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक माती, मुरुम आणि दगडांचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली दोन मजूर अडकले. सहकारी कामगार आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, महसूल विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली https://maharashtramirror.com/ Indapur News
एकाचा मृत्यू; दुसऱ्यावर उपचार
या दुर्घटनेत मशरूबल शेख (वय २५) या मजुराचा मृत्यू झाला. तर नरीम रियाज उद्दीन अख्तर (वय ३०) हे जखमी झाले. जखमी मजुराला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपलब्ध वृत्तानुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
चौकशीचे निर्देश
या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुःख व्यक्त करून सखोल चौकशीचे निर्देश दिले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी करून दोष आढळल्यास कारवाई करण्याची भूमिका मांडली. इंदापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
महामार्गावरील बांधकामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळल्याने कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का आणि दुर्घटनेला नेमकी कोणती कारणे कारणीभूत ठरली, हे चौकशीत स्पष्ट होणार आहे.



