पुणेपिंपरी चिंचवड

Pune News : वसतिगृहांमध्ये माळी व पहारेकरी पदांसाठी तात्पुरती भरती

Pune News : पुणे: पुणे जिल्ह्यातील सैनिकी मुलींचे वसतिगृह, नवी पेठ येथे एक माळी आणि मुलांचे वसतिगृह, पर्वती येथे एक पहारेकरी अशा दोन अशासकीय पदांसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या भरतीसाठी इच्छुक व पात्र माजी सैनिक तसेच इतर नागरिकांनी आपले अर्ज संबंधित वसतिगृहांमध्ये १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी सैनिकी मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिकेशी भ्रमणध्वनी क्रमांक ७७७६८०५८२४ तसेच मुलांच्या वसतिगृहाच्या अधीक्षकाशी भ्रमणध्वनी क्रमांक ७३००२३१०५० वर संपर्क साधावा. असे मेजर एस. फिरासत (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

स्मार्ट प्रकल्पाचे माहिती व तक्रार निवारण कॉल सेंटर सुरू

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्याच्या कृषी पणन संचालनालयाच्यावतीने शेतकरी, व्यापारी आणि कृषी पणन क्षेत्रातील संबंधित घटकांसाठी माहिती व तक्रार निवारण कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन संचालक तथा स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी प्रमुख संजय कदम यांनी केले आहे.

या कॉल सेंटरचा विनाशुल्क टोल फ्री क्रमांक १८००२१०११७७ तसेच ०२०-६५०४५००० हा संपर्क क्रमांक असून संबंधित घटकांना सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० या वेळेत विनाशुल्क संपर्क साधता येणार आहे.

या कॉल सेंटरच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि खासगी बाजारांच्या कामकाजासंदर्भात माहितीसोबतच बाजार नियमनातील सुधारणा, नवीन परवाना प्रक्रिया, तसेच कृषी पणन व्यवस्थेशी संबंधित नियम व अटी यांची माहिती व मार्गदर्शन मिळविण्यासह तसेच तक्रारीही नोंदविता येणार आहेत. कृषी बाजार समित्यांच्या कामकाजाबाबत अडचणी, प्रश्न किंवा तक्रारी असल्यास शेतकरी व व्यापाऱ्यांना या कॉल सेंटरवर संपर्क साधता येणार आहे, असेही श्री. कदम यांनी कळविले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button