मुंबईठाणे
Trending

Rupali Thombare : “दर 15 दिवसांनी नाशिकला, पप्पा की ‘शुगर डॅडी’ माहिती नाही!”; रुपाली ठोंबरेंचा चाकणकरांवर तुफान हल्लाबोल

Rupali Thombare On Rupali Chakankar : “जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा”; राजीनाम्याच्या ‘हसऱ्या’ फोटोवरून रुपाली पाटील ठोंबरे संतापल्या, चाकणकरांना म्हटले ‘वेडी’ आणि ‘मनोरुग्ण’

पुणे :- नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या सेक्स स्कँडल प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दोन महिला नेत्यांमधील वाद आता विकोपाला गेला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “त्या भोंदू बाबाला पप्पा म्हणायच्या की ‘शुगर डॅडी’, हे मला ठाऊक नाही, पण दर 15 दिवसांनी चाकणकर नाशिकला काय करायला जायच्या?” असा टोकदार सवाल ठोंबरे यांनी विचारला आहे.

“संविधानिक पदाची जबाबदारी विसरलात”

रुपाली पाटील ठोंबरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चाकणकरांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या,”एखाद्या विकृत कृत्य करणाऱ्या माणसाला आपला ‘गुरू’ मानणारी ही बाई दर पंधरा दिवसांनी नाशिकला जात होती. कोणाशी बोलावे किंवा कुठे फिरावे, हे प्रत्येकाचे वैयक्तिक स्वातंत्र्य असले तरी, जेव्हा तुम्ही एका संविधानिक पदावर (महिला आयोग अध्यक्ष) बसता, तेव्हा तुम्हाला अत्यंत जबाबदारीने वागावे लागते. पण चाकणकरांनी या पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे.”

राजीनाम्याच्या ‘त्या’ फोटोवरून संताप

शुक्रवारी रात्री रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत चाकणकर हसताना दिसत आहेत. याच फोटोवरून ठोंबरे यांनी संताप व्यक्त केला:

“जनाची नाही तर मनाची लाज ठेवा”: “इतके गंभीर आरोप असताना आणि महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या बाबाशी संबंध उघड झाल्यावरही तुम्हाला हसू कसे येते? तुम्हाला जनाची नाही तर किमान बाई म्हणून मनाची तरी लाज वाटायला हवी होती.”

“अगं वेडी आहेस का?”: “राजीनामा देताना हसतायत आणि वर सांगतायत की ‘वैयक्तिक कारण’ आहे. अगं वेडी आहेस का तू? की मनोरुग्ण आहेस? कोणता नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेस?” अशा शब्दांत ठोंबरेंनी चाकणकरांची खरडपट्टी काढली.

“तो बाबा तुझ्या नवऱ्याच्या पायाला लाव!”

रुपाली चाकणकर यांनी खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर बोलताना ठोंबरे म्हणाल्या, “त्या भोंदू बाबाचे पाय तुला पुजायचे असतील तर तुझ्या नवऱ्याला लावायला सांग, आम्हाला त्याच्याशी देणेघेणे नाही. पण महत्त्वाच्या पदावर बसून जो बालिशपणा आणि ढोंगीपणा चालला आहे, तो महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही.”

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button